Tuesday, May 10, 2022
फोडणीचे वरण/आमटी/सार
Thursday, May 6, 2021
Aroma Therapy once more - कांदा लसूण मसाला
मनाला मरगळ यायला लागली की सगळी हातातली कामं बाजूला ठेवायची आणि मस्तपैकी मसाले भाजायला घ्यायचे. जादू असते या वासात. रंध्रारंध्रात बसलेली मरगळ बाहेर पडून तिथे भाजलेले रानटी वेलदोडे, सुंठ, हळकुंड, लवंग यांचा सुगंध जाऊन बसतो. आणि मसाला पूर्ण होईपर्यंत आपण परत स्वच्छंदी होऊन जातो. आणि एक काम होऊन जाते ते वेगळेच. अरोमा थेरपी अजून वेगळी काय असते?
- एक किलो कांदा
- शंभर ग्रॅम लसूण
- धने २०० ग्रॅम..
- कोरडे खोबरे पाव किलो..
- तीळ ५० gm
- सुकी मिरची पाव किलो..
- हळकुंड
- खडा हिंग
- जिरे १०० ग्रॅम
- शाह जिरे २० ग्रॅम
- दगड फूल २० ग्रॅम
- जावित्री २० ग्रॅम
- मिरे २० ग्रॅम
- लवंग २० ग्रॅम
- दालचिनी २० ग्रॅम
- तमाल पत्र २० ग्रॅम
- मसाला वेलदोडे २० ग्रॅम
- सुंठ २० ग्रॅम
- बदामफूल २० ग्रॅम
Monday, April 26, 2021
सांबार मसाला
Tuesday, March 30, 2021
ताकातली सोलकढी (षड रस रसनेचे - आंबट - ३)
कैरी, चिंच यानंतर पुढचा आंबट पदार्थ घेऊन येत आहे. कोकम. मूळ रेसिपी मधला मुख्य घटक म्हणजे नारळाचे दूध. पण work from home आणि work for home हे दोन्ही म्हणजे तारेवरची कसरत. गडबडीची वेळ. त्यात कोकम भिजत घालावे, नारळाचे दूध काढावे म्हणजे जरा वेळखाऊ किचकट काम. त्यामुळे दुधाची तहान ताकावर म्हणत थोडा रेसिपी मध्ये सोपा ट्विस्ट. ताकातली सोलकढी.
दही घुसळून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घाला. त्यात तयार कोकम आगळ घाला. मीठ, साखर, किसलेले आले, जिरेपूड, चिरलेली कोथिंबीर घाला. मुलगी लहान असल्यामुळे मी हिरवी मिरची घातली नाही पण आवडत असेल तर मिक्सर ला हिरची मिरची, आले, कोथिंबीर असे फिरवून घालू शकता.
नाश्ता झाल्यावर अकरा वाजता तहान तहान होते तेव्हा प्यायला चांगला प्रकार आहे हा. किंवा जेवणात पण घेऊ शकता. पाहुणे आले की welcome drink म्हणून देऊ शकता.
त्याचे काय आहे उन्हाळ्यात सुद्धा cold drink च्या बाटल्या न पिणारे काही वेडे आहेत या जगात अजून पण. आम्ही त्यातलेच. मग गरमी मध्ये असे काय काय करत बसायचे घरी. तुम्ही आमच्या वेडेपणा मध्ये सहभागी होणार का? कोल्ड ड्रिंक पेक्षा हे पिऊन बघणार का? नक्की करून बघा.
- अवनी गोखले टेकाळे
Monday, March 29, 2021
ठेचा (शड रस रसनेचे - तिखट -१)
Sunday, March 28, 2021
रस शेवया (शड रस रसनेचे - गोड - १)
Friday, March 26, 2021
चिंचेचे पन्हे (शड रस रसनेचे - आंबट - २)
Wednesday, March 24, 2021
बाळ लोणचे (शड रस रसनेचे - आंबट - १)
अन्नाचे रस सहा. गोड, आंबट, तिखट, तुरट, कडू, खारट. याच सहा रसांवर आधारित पुढची लेखमाला. यातला तोंडाची चटक वाढवणारा सगळ्यात प्रमुख रस म्हणजे आंबट. आणि त्या आंबट ची सम्राज्ञी म्हणजे कैरी!! तर सगळ्या चवींवर लिहिणार आहेच.. पण सीझन संपेपर्यंत कैरी वर जोर देऊया..
गरमी आवडण्याचे एकमेव कारण म्हणजे कैरी आणि आंबा. आत्ता बाजारात असलेल्या कैरीला पावडर लावली असेल, आत्तापासून नको आणायला, बाधेल, घसा बसेल, पित्त होईल असे काही सुज्ञ विचार असणाऱ्यांनी पुढे वाचूच नका.
वर्षाचे साठवणीतले लोणचे जानेवारी पर्यंत बुडाला गेलेले असते. आणि मग लिंबू लोणच्यावर भागवा भागवी करत वाट बघणे चालू असते ते कैरीच्या आगमनाची. बाकी ते प्रेगनन्ट बाई डोळे मिचकावत कैरी खाते हे फक्त पिक्चर चे नियम आहेत. आपल्याकडे तसं काही नसतं.. बाजारात पहिली कैरी आल्यापासून शेवटची कैरी येईपर्यंत खवय्यांच्या घरात दररोज कैरी असतेच. आणि अबालवृद्ध सगळ्यांचा त्यावर डोळा असतो. अशातच घरातली बाई ओट्याशी सिझन ची पहिली कैरी चिरायला घेते. मग सगळे स्वयंपाकघरात डोकावत एक एक फोड उचलत जातात. मग आधी नुसती कैरी खाणे, मग मीठ लावून खाणे, मग मसाला लावून खाणे, असे करत करत जर शेवटी उरलीच कैरी तर मग पदार्थ वगैरे बनवायला पुढे जायचे.
तसे तर कैरीचे खूप प्रकार बनवतोच आपण. पण त्यातला मानाचा पहिला मानकरी म्हणजे बाळ लोणचे. कैरी बाळ असते म्हणून बाळ लोणचे म्हणायचे का लोणच्याचे बाळ रूप म्हणून बाळ लोणचे म्हणायचे हे आपले ज्याचे त्याने ठरवायचे. आपण ठरवत नाहीच काही, डायरेक्ट करायला घेतो. फार वेळ घालवायचा नाही बनवण्यामध्ये. बनवण्यापेक्षा जास्त जोर खाऊन संपवून टाकण्यावर पाहिजे. त्यामुळे सरळ तयार लोणचे मसाल्याचे मोठे पाकीट सिझन सुरु झाला कि आणूनच ठेवायचे. (आपण काही जाहिरात करत नाही कोणाची, पण तरी केप्र चा चांगला असतो.)
कैरी चिरून त्यात मसाला, मीठ आणि कैरी आंबट किती आहे त्या प्रमाणात गूळ घालायचा. फोडणी करायची त्यात थोडी मोहरी आणि भरपूर हिंग(मिरे आणि मेथ्या आवडत असल्यास ते पण घालू शकतो). आणि फोडणी थंड झाली की वरच्या मिश्रणात घालून हलवायचे. एका जेवणासाठी माणशी एक छोटी बाळ कैरी घ्यावी. हे लोणचे "टिकत" नाही याची दोन कारणे - एक म्हणजे नवीन नवीन आलेल्या कैऱ्या पिवळ्या असतात, त्यामुळे घालून ठेवलेले लोणचे टिकत नाही. आणि दुसरे कारण म्हणजे जेवण संपेपर्यंत वाडग्यातले लोणचे संपलेलेच असते.
if(कैरी available in market ==true)
{Execute same recipe every day}
बाकी बाळ लोणच्यावरच थांबायला नको. पटापट बनवून, खाऊन परत माझ्या ब्लॉग वर या. कैरीचा पुढचा पदार्थ वाचण्यासाठी. तोंडाला पाणी सुटले का? अजून सुटले नसेल तर फोटो बघत रहा..
-- अवनी गोखले टेकाळे
Sunday, March 21, 2021
अन्नपूर्णा
माझी आजी म्हणायची (ती काय काय म्हणायची ते अख्ख्या महाराष्ट्राने वाचले म्हणा) कोणाला खास जेऊ घालायचे तर पानात रंगसंगती चोख असावी.. उगाच करायचे म्हणून विचार न करता पदार्थ करत सुटले आणि पान वाढल्यावर कळले सगळेच पिवळ्या रंगाचे.. असले चांगले दिसत नाही. खाणाऱ्याला अशा पानात जेवावे वाटत नाही.. आधी मेनू ठरवावा त्याचे रंग वास चवी एकमेकांना पूरक असाव्यात.. आणि मग पदार्थ बनवायला घ्यावे..
माझे माहेर म्हणजे कोकणी खाद्य संस्कृती आणि सासर म्हणजे मराठवाडा. ओल्या नारळाचे शेंगादाण्याशी लग्न लागल्यावर व्हायचे ते सगळे धमाल गोंधळ उडाले माझे सुरवातीला.. तसा स्वयंपाक येत होता आधीपासून पण इकडे नावं ऐकून गांगरून जायचे मी.. डुबुकवडी, माणिक पैंजण, मोहन भाऊ, सुशीला, एसर, पूड चटणी, गडगीळ, दिलपसंद, चमकुरा असे नाव ऐकले की काय करायचं आणि कसं करायचं.. आम्हाला आपले फणस, ओले काजू, कुळीथ, पातोळ्या, आंबोळ्या, घावन, रातांबे असले शब्द ऐकायची सवय.. त्यात परत भाजीत शेंगा कूट घालायचे का ओला नारळ हे अजून एक प्रश्नचिन्ह.. पण नवीन पदार्थ खायची आवड असल्यामुळे करायला पण शिकले.. माझे पाककलेतील ज्ञान दुप्पटीने वाढले..
चवीचे म्हणाल तर माझे सासू सासरे दोन्ही नणंदा आणि नवरा सगळेच उत्तम स्वयंपाक करतात.. लग्नाच्या आधी पहिल्यांदाच सासरी आलेले आणि तेव्हा केलेल्या स्वयंपाकात वरण सासर्यांनी बनवले होते तेव्हाच लक्षात आले आपला पाककलेचा सोडवलेला पेपर ज्या मास्तरांच्या हातात तपासायला जाणार त्यांचा पाया भक्कम आहे.. अजूनही त्यांनी एखाद्या पदार्थाला दाद दिली मनापासून की मी एकदम सातवे असमान पर असते.. आणि तेव्हाच दुसरे हे पण जाणवले की इथे पुरुषांच्या सुध्धा स्वयंपाक करण्यात तितकीच सहजता आहे.. काही पुरुष हळूच बायकोला लपून छपून मदत करतात, कोणाला कळू देत नाहीत.. तसेही नाही इथे.. सहजतेने सांगितले होते पहिल्याच भेटीत वरण बाबांनी केले आज आणि भाजी आईनी केली.. आवडले ना तुम्हाला.. इतके सहज..
अभ्यास केल्यावर वार्षिक परीक्षा देतो ना तसे महालक्ष्मी (गौरी चा सण) चा सोवळ्यात स्वयंपाक करताना वाटते मला.. आमची चार कुटुंब एकत्र येऊन हा सण करतात आणि हा स्वयंपाक मी आवर्जून करते वार्षिक परीक्षा समजून.. वर्षभरात केलेल्या सगळ्या प्रयत्नांचा कस लागतो तेव्हा.. सोळा भाज्या, पाच कोशिंबिरी, तीन चटण्या, पुरण पोळी, साधी पोळी, कटाची आमटी, कढी, चमकुर्याचे भजे, घोसवळ्याचे भजे, कुरडई, साखरभात, साधा भात, वरण, खीर, कानवला.. तरी काहीतरी राहिलेच आहे यादीत बहुतेक (एक यादी असते केलेली तेव्हा त्यात एक एक पदार्थ झाला की टिक टिक करत जायचे म्हणजे विसरत नाही) हा सगळा स्वयंपाक मी आणि धनश्री करतो सासूबाईंच्या हाताखाली. (हो हो.. ही तीच धनश्री.. तोरण विणायला सोबत रात्री जागायची तीच.. माझी चुलत जाऊ. तिच्याबद्दल निवांत परत कधीतरी) तर हा स्वयंपाक जेव्हा दाद मिळून पास होतो तेव्हा वर्षभरात केलेल्या सगळ्या छोट्या मोठ्या प्रयोगाचे समाधान वाटते..
आता हे सगळे पुराण झाले स्वयंपाक बद्दल.. पण तो काय पोट भरायला करतोच आपण सगळे.. थोडे फार नावीन्य पण आणायचा प्रयत्न करतो. पण याच्या पलीकडे जाऊन एक छंद आहे जगावेगळा.. त्याच्यासाठी लिहायचा खटाटोप.. मला मसाले, लोणची आणि भाजण्या करायला प्रचंड आवडते.. बहुतेक हे करताना जो वास येतो खमंग त्याच्या वरच्या प्रेमामुळे असेल.. पण तुफान आवडीने मी ही गोष्ट करते.. भयानक उत्साह संचारतो माझ्यात.. वेळात वेळ काढून मसाल्यासाठी खडे मसाले बाजारातून आणण्यापासून सगळे जाम भारीच वाटते मला.. सांबार मसाला, काळा मसाला, उपास आणि साधी थालीपीठ भाजणी, कैरीचे लोणचे हे प्रकार माझेच मला आवडतात खूप..आता विकतचे नको वाटतात.. खूप प्रयोग करून कमावलेला फॉर्म्युला आहे माझ्याकडे या सगळ्याचा..( माझ्या पर्सनल ब्लॉग वर जाऊ तिथे खाऊ या विषया अंतर्गत माझे असेच काही प्रयोग सापडतील तुम्हाला प्रमाणासहित.. ) माझ्या सोबत अजून काही मैत्रिणींना हे वेड लावले आहे..
तर यापुढे एक नक्की करा.. तुमच्यासमोर कोणी बोलायला लागले की आयटी मधल्या किंवा जीन्स टीशर्ट घालणाऱ्या मुलींना स्वयंपाकाची बिलकुल आवड नसते तर त्यांना एकदा थांबवून सांगा.. त्या जगात पण वेड्या मुली शिल्लक आहेत अजून.. ज्यांना छंद म्हणून मसाले, लोणची आणि भाजण्या घरी बनवायचा नाद आहे.. पारंपरिक पाककला काही संपुष्टात वगैरे येत नाही.. चवीने खाणारे चवीने खाऊ घालतात पण.. उगाच खाद्यसंस्कृती ची वैश्विक चिंता वगैरे करून त्रागा करू नका म्हणावं..
मीठ ना, घाल ग अंदाजाने,
याचे अचूक गणित ती समजते..
तेव्हा हातात पळी घेतलेली ती,
देव्हाऱ्यात बसलेली अन्नपूर्णा भासते..!!!
Wednesday, June 10, 2020
या धिरड्यांवर शतदा प्रेम करावे..
Monday, January 20, 2020
काळा मसाला की aroma therapy
- धने पाव किलो..
- कोरडे खोबरे पाव किलो..
- सुकी मिरची पाव किलो..
- हळकुंड
- खडा हिंग
- जिरे १०० ग्रॅम
- शाह जिरे २० ग्रॅम
- दगड फूल २० ग्रॅम
- कर्ण फूल /जावित्री २० ग्रॅम
- मिरे २० ग्रॅम
- लवंग २० ग्रॅम
- दालचिनी २० ग्रॅम
- तमाल पत्र २० ग्रॅम
- मसाला वेलदोडे २० ग्रॅम
Wednesday, October 23, 2019
स्वयंपाक घर आणि पूर्व तयारी
किराणा आणल्यावर करून घेऊया ही तयारी..
गुळाची ढेप चिरून ठेवणे
रवा, दलिया, शेवया भाजून ठेवणे
दाणे भाजून ठेवणे
दाण्याचे कूट तयार ठेवणे
चिंच गूळ चटणी तयार fridge मध्ये ठेवणे. एक महिना टिकते. आंबट वरण, काही भाज्यात पटकन घालता येते. आयत्या वेळेला चिंच भिजवून कोळ करण्यापेक्षा बरे पडते .
२ ओले नारळ खवून air tight डब्यात deep fridge मध्ये ठेऊन देणे (एक महिना टिकतो)
धनेजिरे पूड करून ठेवणे
मिरे दालचिनी लवंग भाजून पूड करून ठेवणे
कोरडे खोबरे किसून ठेवणे
तीळ, कोरडे खोबरे, शेंगदाणे, खसखस, वाळलेला कढीपत्ता एकत्र मिक्सर ला फिरवून ठेवणे. पटकन रस्सा भाज्या मध्ये घालता येते.
वेलदोड्याची पूड करून ठेवणे
पिठीसाखर दळून ठेवणे
उपासाची भाजणी आणि साधी थालिपीठ भाजणी - करायला नाही झालं घरी तरी निदान पिठं तरी आणून ठेवूया
तयार श्रीखंड छोटे १-२ डबे आणून deep fridge मध्ये ठेवणे (एक महिना टिकतं) अचानक पाहुणे आल्यावर गोड म्हणून पुढे करता येते. मुलांना पटकन पोळी बरोबर देता येते एखाद वेळा
Weekend लाच भरून ठेऊ मिसळणाचा डबा, चहा साखर मिठाचा डबा आणि तेलाचे बुटले.
भाज्या आणल्यावर करूया ही तयारी
पालेभाज्या, कोथिंबीर निवडून कागदात गुंडाळून ठेवणे
Flower ची फुले काढून ठेवणे
गवार आणि तत्सम शेंगा मोडून ठेवणे
पावटे मटार आणि तत्सम शेंगा सोलून ठेवणे
लसूण सोलून ठेवणे
आलं लसूण paste बनवून ठेवणे
मिरच्यांची डेख काढून मध्यम आकाराचे तुकडे चिरून डब्यात भरून ठेवणे
कढीपत्ता पानं सुट्टी करून डब्यात भरून ठेवणे
भाज्या नसतील तेव्हा पटकन करता येतील असे हे काही प्रकार घरात ठेऊया
सांडगे
डांगर
कुळीथ पीठ
हरबर्याचा वाळलेला पाला
मिश्र डाळी
सकाळच्या धावपळीच्या एक तासा मधील एक मिनिट वाचवूया.. त्या एका मिनटात paper मध्ये headline वरती तरी नजर टाकुया.. अजून काही छोट्या idea comments मध्ये सांगा ज्या तुमचे माझे सगळ्यांचेच सकाळच्या गडबडीत एखाद मिनिट वाचवतील..
Wednesday, August 21, 2019
पौष्टिक आणि पारंपरिक noodles
ब्लॉग आवडला तर जरूर विचार करा.. follow करा, comment करा.. तुमचा एक feedback लिहायला अजून motivation देईल.. माझ्या नावासकट "अवनी गोखले - टेकाळे" पोस्ट share करायला हरकत नाही.. आणि कुरडयाची भाजी बनवल्यावर खायला बोलावलं तरी हरकत नाही.. :)
Monday, August 5, 2019
जीवन करी जीवित्व - भाग २
- पोहे (कांदे पोहे / बटाटे पोहे)
- दडपे पोहे
- दही पोहे
- कोहळाचे पोहे
- सुशीला
- उपमा
- मिक्स धान्याचा दलिया
- शेवयाचा उपमा / vermicelli
- ज्वारीची उकडपेंडी
- गव्हाचा दलिया
- बाजरीचा खिचडा
- राळ्याचा उपमा
- कुरडई ची भाजी ( कुरडयाच्या चुऱ्याचा उपमा)
- सांजा
- मोकळी भाजणी
- तांदळाची उकड
- नाचणीचे आंबील
- ज्वारीचे आंबील
- शिरा (केळी/strawberry/काळी द्राक्ष/अननस घालून)
- गोड शेवया
- कणकेचा शिरा
- घावन
- आंबोळी
- मिक्स पिठाची धिरडी
- मुगाचे डोसे /पिसारट्टू
- नाचणीचे डोसे
- टोमॅटो ऑम्लेट
- eggs ऑम्लेट
- मुगाची धिरडी
- boiled eggs
- अप्पे
- गोडाचे अप्पे
- आलू पराठा
- पनीर पराठा
- मेथी पराठा
- धपाटे
- पुरी भाजी
- भोपळ घारगे
- थालीपीठ
- cutlet - बीटरूट+गाजर + कांदा / मटार +पालक +कोथिंबीर
- फोडणीचा भात
- फोडणीची पोळी
- पोळीचा लाडू
- इडली चटणी / सांबार
- वडा सांबार
- डोसे
- धिरडी
- उत्तप्पे
- नीर डोसे
- मिसळ
- कडधान्याची उसळ
- ढोकळा
- मिक्स सलाड
- smoothies
- boiled छोले
- छोले भटुरे
- भाजणीचे वडे
- कॉर्न टिक्की
- boiled स्वीट कॉर्न/मटार चाट
- मुटके
- ब्रेड बटर
- चहा - ब्रेड / biscuits/खारी/toast
- sandwitch
- oats / corn flakes /ragi flakes
- साबुदाणा खिचडी
- साबुदाणा वडे
- बटाट्याचा किस
- रताळ्याचा किस
- उपासाचे अप्पे
- उपासाचे कटलेट (रताळे +बटाटे +लाल भोपळा घालून)
- उपासाचे थालीपीठ (साबुदाणा +भगर+ राजगिरा पिठाची भाजणी )
- रताळ्याच्या गोड फोडी
- शिंगाड्याच्या पुऱ्या
Friday, July 12, 2019
जीवन करी जिवित्व
- कांदा (काचऱ्या, भरडा)
- बटाटा (काचऱ्या, भरीत, रस्सा भाजी, दह्यातली भाजी)
- टोमॅटो (भरीत/कूट घालून)
- भेंडी (कूट, अमसूल घालून, कांदा लसूण घालून, दही भेंडी)
- वांगी - भरताची आणि भाजीची
- दुधी भोपळा - गोल आणि साधा
- लाल भोपळा - डाळ घालून, भरडा भाजि
- चक्की भोपळा
- ढेमसे / दिलपसंद
- पडवळ - डाळ घालून, stuffed
- दोडका
- घोसावळे
- शिमला मिरची
- सुरण
- अळकुडी
- तोंडली
- परवल
- कच्ची पपई
- कच्ची केळी
- बीट
- मुळा
- गवार
- कोबी
- फ्लॉवर
- फणस
- नवलकोन
- मुळ्याच्या शेंगा /डिंगऱ्या
- पापडी वाल
- कारली
- फरसबी
- baby corn
- ब्रोकोली
- शालगम
- मशरूम
- कांद्याची पात
- चाकवत
- करडई
- चवळी चा पाला
- हिरवा माठ
- लाल माठ
- राजगिऱ्याचा पाला
- मुळ्याचा पाला
- घोळ
- अळू
- पालक
- मेथी
- चुका
- अंबाडी
- शेपू
- double bee
- पावटा
- मटार
- तुरीच्या शेंगा
- कडवे वाल
- डाळिंब्या
- वाटाणे
- मूग
- मटकी
- काळे पोलीस
- सोले / ओले हरबरे/घाटे
- चणा - छोटे / मोठे
- सोयाबीन ची उसळ
- कुळीथ / हुलगे
- बेसन पिठलं
- कुळथाचं पिठलं
- हरबर्याच्या वाळलेल्या पाल्याची भाजी
- पाटवड्याचा रस्सा/ डुबुक वडी/ गोळ्याची आमटी
- सांडग्याची भाजी
- सोया वड्याची भाजी
- पनीर
