Veg खाणाऱ्याकडे options कमी असतात.. रोज रोज काय भाजी करायची.. वांगी भेंडी खाऊन खाऊन कंटाळा आला.. हि वाक्य साधारण रोजच कानावर पडणारी कधी दुसऱ्याच्या तोंडून कधी आपल्याच तोंडून.. मग काहीतरी वेगळे करायचा खटाटोप.. मग आहेतच recipe चे खूप blogs आणि videos .. पण video बघितल्यावर लक्षात येत यातले बरेच ingredients घरात नाहीत.. मग गोल फिरून गाडी परत कांदे, बटाटे वरच येऊन थांबते .. तशा सगळ्या भाज्या मंडई मध्ये असतातच समोर पण तरी आपण त्याच ठराविक भाज्या घेऊन येतो.. ही लिस्ट करण्याचा खटाटोप एवढ्याच साठी कि आठवड्याची भाजी आणताना जर ही लिस्ट पहिली तर थोडं repetition टाळता येऊ शकेल.. आवडीची भाजी आठवड्यात चार वेळा खाण्यापेक्षा नावडतीची भाजी महिन्यात एखाद वेळा खाल्ली तर तेवढाच थोडा change.. यातल्या अर्ध्या भाज्या मिळत नसतील किंवा आवडत नसतील किंवा माहीत नाहीत असा गृहीत धरला तरी महिन्यात कुठली भाजी रिपीट होणार नाही.. आणि या सगळ्या भाज्या २ -३ वेगवेगळ्या प्रकारांनी येतात..
फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्य आणि सगळ्यात शेवटी घरात भाजी नसताना करायच्या भाज्या अशा क्रमाने सगळ्याच लिहून काढल्या आहेत..
- कांदा (काचऱ्या, भरडा)
- बटाटा (काचऱ्या, भरीत, रस्सा भाजी, दह्यातली भाजी)
- टोमॅटो (भरीत/कूट घालून)
- भेंडी (कूट, अमसूल घालून, कांदा लसूण घालून, दही भेंडी)
- वांगी - भरताची आणि भाजीची
- दुधी भोपळा - गोल आणि साधा
- लाल भोपळा - डाळ घालून, भरडा भाजि
- चक्की भोपळा
- ढेमसे / दिलपसंद
- पडवळ - डाळ घालून, stuffed
- दोडका
- घोसावळे
- शिमला मिरची
- सुरण
- अळकुडी
- तोंडली
- परवल
- कच्ची पपई
- कच्ची केळी
- बीट
- मुळा
- गवार
- कोबी
- फ्लॉवर
- फणस
- नवलकोन
- मुळ्याच्या शेंगा /डिंगऱ्या
- पापडी वाल
- कारली
- फरसबी
- baby corn
- ब्रोकोली
- शालगम
- मशरूम
- कांद्याची पात
- चाकवत
- करडई
- चवळी चा पाला
- हिरवा माठ
- लाल माठ
- राजगिऱ्याचा पाला
- मुळ्याचा पाला
- घोळ
- अळू
- पालक
- मेथी
- चुका
- अंबाडी
- शेपू
- double bee
- पावटा
- मटार
- तुरीच्या शेंगा
- कडवे वाल
- डाळिंब्या
- वाटाणे
- मूग
- मटकी
- काळे पोलीस
- सोले / ओले हरबरे/घाटे
- चणा - छोटे / मोठे
- सोयाबीन ची उसळ
- कुळीथ / हुलगे
- बेसन पिठलं
- कुळथाचं पिठलं
- हरबर्याच्या वाळलेल्या पाल्याची भाजी
- पाटवड्याचा रस्सा/ डुबुक वडी/ गोळ्याची आमटी
- सांडग्याची भाजी
- सोया वड्याची भाजी
- पनीर
No comments:
Post a Comment