Showing posts with label बंध मैत्रीचे. Show all posts
Showing posts with label बंध मैत्रीचे. Show all posts

Monday, May 31, 2021

Blood donation (बंध मैत्रीचे - ३)

प्रीतम कुलकर्णी. m.tech च्या धमाल मित्रांपैकी हा एक. प्रत्येक गोष्टीला दोन मते असतात आणि ती एकदम north pole, south pole सारखी एकदम विरुद्ध दोन टोके. हे आमच्या दोघांकडे बघून सगळ्यांना पटले असेल कॉलेज मध्ये. इतके प्रचंड आम्ही भांडायचो, अजून पण भांडतो. प्रत्येक गोष्टीत अरे ला कारे झालेच पाहिजे, नाहीतर प्रीतम भेटल्यासारखे वाटत नाही. बारा वर्षांच्या या मैत्रीत काल पहिल्यांदा एकमत झाले. न भांडता पहिल्यांदाच केलेली गोष्ट. सत्कारणी लावलेला रविवार - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या blood donation drive मध्ये केलेले मतदान. 

Pandemic च्या काळात blood donation हे आपले सामाजिक कर्तव्य आहे आणि आपण ते बजावले पाहिजे. आपल्याकडे दान करायला पैसे असतीलही, नसतील ही. पण दान करायला रक्त नक्की आहे. येत्या एक वर्षामध्ये प्रत्येकाच्या कुटुंबाने या ना त्या प्रकारे आजारपणाला तोंड दिले. येणारे दिवस अजून काय रंग दाखवतील काय माहित. या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त किंमत कोणाची कळली असेल तर आपल्याला फुकट oxygen देणारी झाडे आणि अडीनडीला रक्त लागल्यावर ते देणारे रक्तदाते. 

Blood donation ची ही काही पहिली वेळ नाही, या आधी कधी लिहावे वाटले नव्हते. पण आज वाटले. ते याच साठी, की सध्या खूप गरज आहे. आणि खूप कमी लोक सध्या एलिजिबल आहेत. काहींनी लस घेतली आहे म्हणून, काहींना करोना होऊन गेला आहे म्हणून. काहींना तब्बेतीचे त्रास आहेत म्हणून. काही वयामुळे इच्छा असून करू शकत नाहीत म्हणून. काही जण घाबरून डोनेशन ला घराबाहेर पडत नाहीयेत म्हणून. 

ही पोस्ट लिहिण्यामागे माज करते वाटले तर तसे समजा, आवाहन करते वाटले तर तसे समजा. जे समजायचे ते समजा. पण मनापासून हात जोडून केलेल्या विनंतीचा एकदा मनापासून विचार नक्की करा. तंदुरुस्त व्यक्तींनी अवश्य रक्तदान करा!! तुमचे फोटो सोशल मीडिया वर टाकून बाकी मित्रांना पण प्रोत्साहन देत रहा. 

-- अवनी गोखले टेकाळे 


Friday, April 9, 2021

केतकी, मी आणि ऑपरेटिंग सिस्टिम्स (बंध मैत्रीचे - २)

PL(preparatory leave) सुरू झाली की night मारून अभ्यास करणे सुरू व्हायचे. मग तो अभ्यास रात्रीचे जेवण करून जो शांतपणे सुरु व्हायचा तो कधी एक पर्यंत तर कधी पहाटे पाच पर्यंत. आणि मग रात्री अभ्यास करायचा तर संध्याकाळी थोडी रेफ्रेशमेंट पाहिजेच ना. या नावाखाली रोज संध्याकाळी तळजाई वर तर कधी सारंग च्या कट्ट्यावर टाईमपास चालू असायचा आमचा. त्याच तळजाई वरचा पहिला किस्सा लिहिला होता. भजी खाताना जेव्हा पोलीस पकडतात. आज त्याच बंध मैत्रीचे मधला पुढचा किस्सा. केतकी, मी आणि ऑपरेटिंग सिस्टिम्स!!!

आज आठवण यायचे कारण म्हणजे आज सगळी कॉलेज मधली पुस्तके काढून बसलेले आवरत. पण आमचे लाडके पुस्तक दिसलेच नाही कुठे. galagotia publication चे operating systems चे भगव्या रंगाचे जाडजूड पुस्तक. केतकी चे आणि माझे फेव्हरेट पुस्तक. 

व्हायचे काय, रात्री आम्ही एकत्र जागून अभ्यास करायचो. घरात असायचो तरी एकमेकींना फोन चालूच. आणि त्यात परत संध्याकाळी घरी सांगितले कि केतकी ला भेटायला जातेय तर घरच्यांना प्रश्नचिन्ह असायचे. सारख्याच तर सोबत असता, परत जेवण केल्यावर अभ्यासाला ती येणार आहेच. मग आत्ता घाईने भेटून काय काम? खरच आता विचार केल्यावर वाटत कि पूर्णवेळ सोबत असताना परत घरी आल्यावर एकमेकींना फोन करून तास तास बोलण्यासारखे मधल्या वेळात काय घडायचे काय माहित. पण ते दिवस होतेच तसे. मग त्या वेळी आमच्या साथीला यायचे ते हे पुस्तक. Operating systems चे. कधी पण उठायचे, पुस्तक देऊन येते केतकी ला/केतकी कडून पुस्तक घेऊन येते म्हणून निघायचे. दोघींच्या घराच्या मध्यवर्ती सारंग च्या कट्ट्यावर भेटायचे. भरपूर गप्पा मारायच्या. आणि जाताना ते पुस्तक इकडून तिकडे जायचे. 

डिग्री मिळेपर्यंत त्या पुस्तकात आत काय आहे ते उघडून वाचले नाही. पण प्रत्येक वेळेला भेटायला जाताना पुस्तक सोबत. बाकी घरच्यांना हा प्रश्न कधी पडला नाही की प्रत्येक वर्षी रोज एकच पुस्तक का द्यायचे/घ्यायचे असेल. किंवा त्यांना पडला पण असेल हा प्रश्न पण "बंध मैत्रीचे" हा विषय आई वडिलांच्या syllabus मध्ये पण होताच त्यांच्या तरुणपणात. त्यांनी पण त्यांचे मंतरलेले दिवस असेच घालवले होते कदाचित. म्हणूनच कळत असून पण आम्हाला बंधमुक्त जगू दिले त्या काळात. 

आज आम्ही दोघी आपापल्या ठिकाणी, चांगल्या कुटुंबात सुखी आहोत. केतकी साता समुद्रापार लंडन मध्ये, मी मुंबई मध्ये. त्या दिवसांच्या कृपेने चांगल्या नोकरीवर स्थिरावलो आहोत दोघी. पण आज आपापल्या घरी पिझ्झा ऑर्डर करून खाण्यात पण ती मजा नाही येत जी तेव्हा सारंग च्या कट्ट्यावर दोघीत एक पाणीपुरी खाताना यायची. तेव्हा landline वरती रोज फोन वर बोलायचो, तिचा landline नंबर अजून पण पाठ आहे. आता दोघींनी मोबाईल घेतले, whats app वर बोलतो, कॉल करतो पण मनात सलते ते हे की आता मोबाईल नंबर सेव्ह झाला पण "पाठ" नाही झाला. आज मनात सलते ते एवढेच की सगळ्या गडबडीत, धावपळीत आमचे "operating systems" चे पुस्तक सापडत नाहीये. जे घेऊन आम्ही सारंग च्या कट्ट्यावर भेटू शकू, हवे तेव्हा, हवे त्या क्षणाला!!! 

केतकी, एकदा तुझी पुस्तकं आवर ना, बघ ना कुठे कप्प्याच्या तळात सापडतंय का? आपले operating systems चे पुस्तक!!!

-- अवनी गोखले टेकाळे 


Sunday, July 26, 2020

जेव्हा भजी खाताना पोलिस पकडतात.. (बंध मैत्रीचे-१)

चार मुलांना भजी खाताना पोलिसांनी पकडले असे ऐकले तर काय वाटेल वाचून ..हो पण आमच्या बाबतीत झालं होत असं.. भजी खायचा मोह असा महागात पडेल असं वाटल नव्हत.. स्थळ - पुण्यातली तळजाई ची टेकडी.. वेळ - संध्याकाळ.. मी, केतकी, अज्या, चिटस्.. कागदात गुंडाळलेली भजी.. समोर पोलिस.. आणि खरंच भजी खात होतो फक्त असे सांगणारे आम्ही चौघ.. आयुष्यात प्रत्येक वेळी समोर मूग भजी आली की हेच आठवते..

कॉलेज ची preparatory leave.. दिवसभर अभ्यास करून संध्याकाळी मी आणि केतकी बाहेर पडलो.. तिच्या घरासमोर एक गाडा.. रोज संध्याकाळी ५ वाजता.. छप्पर तोड भजी बनवणाऱ्या आजी.. माझा आणि केतकी चा सोपा प्लॅन होता.. घरातून बाहेर.. भजी प्लेट पोटात.. तिथून तळजाई evening walk.. तृप्त कार्यक्रम.. रात्रभर जागरण करून अभ्यास करायला शरीराला एवढं इंधन पाहिजेच.. पण घोळ घातले नाहीत तर ते आम्ही मित्र कसले..

खाली उतरलो.. आजी गैरहजर.. विरलेले स्वप्न घेऊन आम्ही दोघी तळजाई वर चालत सुटलेल्या.. वाटेत असताना अज्या आणि चिटस् चा फोन.. त्यांना सांगितले आजी आल्या असतील तर भजी घेऊन या इकडे.. गप्पा मारत खाता येतील.. दहा मिनिटात एक मोटर सायकल.. त्यावर हऱ्या नाऱ्या.. हातात द्रोणगिरी सारखी भजी प्लेट.. मिशन फत्ते.. 

रस्त्याच्या मध्येच कुठे खाणार.. म्हणून गाडी थोडी कडेला लावली त्यांनी आणि आम्ही आपले कडेच्या दगडावर बसलो गप्पा मारत.. भजी खायला पहिले भजे उचलणार.. इतक्यात पोलिस.. काय रे इथे काय करताय? म्हणलं भजी खातोय सर.. आम्हाला आधी कळलं नाही भजी खाण्यात कसला प्रॉब्लेम..

मग त्यांच्या प्रश्नांच्या सरबत्ती वरून लक्षात आले.. दोन मुले दोन मुली झाडाच्या कडेला बसून काहीतरी गुलगुलू करतात का काय असा काहीसा चेहरा दिसला त्यांचा..  आता हे नवीनच काहीतरी.. आम्ही आपले एक लडका एक लाडकी सिर्फ दोस्त हो सकते हैं.. वगैरे समजून द्यायच्या इमानदार प्रयत्नात.. आम्ही आपले प्रामाणिक पणे इथे आत्ता जसे लिहिले तसे सगळे कथन केले.. तरी त्यांचे समाधान होई ना.. चार माणसात एक बाईक कशी.. दुसरी गाडी कुठेय.. प्रश्न खूप..  आता काय सांगावं की आम्ही दोघी वॉक ला आलो होतो, वॉक ला गाडी कशी न्यावी बुवा.. प्रॉब्लेमच प्रॉब्लेम.. सगळेच गोंधळ गोंधळ.. शेवटी खूप हतबल झालेले आम्ही कसे तरी समजावले त्यांना.. मग पोलिसांनी आम्हाला इकडे अशात खूप जोड्या येऊन बसायला लागल्या आहेत म्हणून राऊंड ला आलो वगैरे सांगितले.. थोडेसे वडीलधाऱ्या नात्याने बौध्दीक पण दिले जे की आम्हाला मनापासून पटले..

एव्हाना ते भजे थंड होऊन घशात उतरण्याच्या पलीकडे गेले होते.. ज्यासाठी केला होता अट्टाहास! पोलिसांच्या नजरेसमोर आम्ही तळजाई उतरायला घेतली..

खाली उतरत उतरत असताना एक खरोखरच गाडी रस्त्याच्या कडेला थांबलेली दिसली.. खरोखरच लव बर्डस जोडी होती ती.. अरे पोलिसांचा wrong number लागला ना भाऊ.. ते यांच्यासाठी आले होते तर.. आम्ही काही कमी अतरंगी थोडेच आहोत.. जाता जाता पुण्याचे काम करत असतो आपण.. "अहो पोलिस मामा शुक शुक.. हेच ते ज्यांना तुम्ही शोधत होतात.. आजींच्या भज्याची शप्पथ!!!"

ताजा कलम - या कथेतली नावं खरी आहेत.. ज्यांच्यावर मनापासून विश्वास टाकावा असे हे मित्र.. मैत्री मध्ये इतर काही फालतू गोष्टी न आणणारे.. बस की आयुष्यात अजून काय पाहिजे.. 

उद्या परत भेटेन.. मैत्रीच्या वेगळ्या पैलू सोबत.. 

-- अवनी गोखले टेकाळे

Friday, May 22, 2020

बंध मैत्रीचे

जागतिक मैत्री दिन आहे आज. खरे तर मैत्रीला दिन वगैरे साजरे करायची गरजच नसते. ती असते किंवा नसते. असली तर ती आयुष्यभर असते. एका दिवसापुरती नाहीच. पण तरी थोडेसे आज लिहावेसे वाटले मैत्री बद्दल. 

कोणताही पूर्वग्रह न ठेवता वाटेल ते, वाटेल तेव्हा, वाटेल तेव्हढे बोलता येणे म्हणजे मैत्री.. कोणत्याही फायद्याची अपेक्षा न ठेवता सतत भेटायची ओढ असणे म्हणजे मैत्री.. रोजच्या संपर्कात नसेल तरी दिल चाहता है बघून ज्याच्या आठवणीने बेचैन व्हायला होत आणि डोळ्यात पाणी दाटत ते पाणी म्हणजे मैत्री.. समोरच्याला अजिबात वाचन लिखाण विषयात interest नाही तरी जो आपले लेख अत्यंत मनापासून ऐकतो ते ऐकून घेणं म्हणजे मैत्री.. आपण अतिशय मोठी अक्षम्य चूक केली तरी पन्नास शिव्या घालेल पण आपल्याला समजून घेईल ते समजून घेणं म्हणजे मैत्री.. आपण खूप दिवसात भेटलो नाही म्हणून जो आपल्यावर मनापासून चिडेल ते चिडणं म्हणजे मैत्री.. सायंकाळच्या कातरवेळेत लागणारी हुरहूर समजू शकते ती मैत्री.. तुम्ही गरज नसताना बेफिकीर हसत असताना तुमच्या मनातली सल ओळखून काय सगळं ठीक ना हा प्रश्न विचारेल कोणी तर तो प्रश्न म्हणजे मैत्री.. तुम्हाला प्रत्येक वेळी योग्य तोच तोच सल्ला देईल तो सल्ला म्हणजे मैत्री.. वेळ काळ स्थळ यांचे बंधन घालत नाही ती मैत्री.. वय, स्त्री - पुरुष भेद करत नाही ती मैत्री.. 

आता स्त्री पुरुष मैत्रीबद्दल थोडेसे.. मला खूप मित्र आहेत लहान पणापासून.. खूप जिगरी मित्र.. आणि हो, ते माझे मित्र आहेत.. मानलेले भाऊ नाहीत.. राखी बांधायला मला हक्काने आणि निसर्गाने खूप रक्ताचे भाऊ दिले आहेत..मैत्री हे पवित्र नाते मला "मानलेला भाऊ" याच्या पदराखाली झाकायला कधीच आवडले नाही.. रात्री एक एक पर्यंत एकत्र गप्पा मारायला कॉफी शॉप मध्ये बसू असे हे मित्र आहेत.. मध्यरात्री सुद्धा कुठल्याही अडचणीला तेवढ्याच हक्काने हाक मारता येतील असे.. ज्यांच्यासोबत मी फिरत असेन तर आई वडील आणि नवऱ्याला निर्धास्त वाटेल असे.. मी सासरी आल्यावर ज्यांना हक्काने सांगून आले की अधून मधून आई बाबांकडे जात राहा ते हे मित्र आहेत.. हे सगळे मित्र माझ्या घरच्यांना ओळखतात.. आणि माझ्या घरचे मला ओळखतात.. 

मुळात मैत्री ही भावनिक असते.. शारीरिक नाही.. आणि ही सीमारेखा जर तुमच्या मनात अचूक असेल तर कुठलाही मित्र तुमचा गैरफायदा घेऊ शकत नाही.. एक स्त्री म्हणून निसर्गाने माणसं ओळखण्याची, बोलणे ओळखण्याची, नजर आणि स्पर्श ओळखण्याची कला स्त्री ला नकळत दिलेली असते.. पण जर इथे गल्लत केली तर मग मात्र खोल गर्तेत जाण्यापासून तुम्हाला तुम्ही स्वतः देखील अडवू शकत नाही.. ही एक अशी परीक्षा आहे जिथे अभ्यासक्रम पण निश्चित नाही, येणारी प्रश्नपत्रिका पण ठरलेली नाही पण या परीक्षेत तुम्हाला पास होणे सक्तीचे आहे.. बंधनकारक आहे.. एकदा ही परीक्षा पास झाल्यावर मात्र निखळ मैत्रीचा आनंद दुसऱ्या कशातच नाही.. 

आमच्या मित्र मैत्रिणींच्या मैत्रेया बद्दल वाचायला आवडेल का? बंध मैत्रीचे या लेबल खाली मैत्री चे काही किस्से एकत्रित वाचायला मिळतील. 

-- अवनी गोखले टेकाळे !!

Tuesday, April 24, 2012

एक अविस्मरणीय मैफिल


एक असा दिवस ज्या दिवशी तुम्ही खरच काही excitement expect नसते केलेली.. आणि त्याच दिवशी सगळा स्वर्ग तुमच्या समोर येऊन बसतो..

मी आणि हर्षदा मानसी-ओंकार च्या घरी गेलो होतो.. दुपारी साधारण ४ वाजले होते.. खरतर खूप serious , practical विषय discuss करायला भेटलो होतो.. within a single day एक आयुष्याला वेगळे वळण देणारा decision घ्यायचा होता.. पुढे काय माहित नाही.. काही तरी चांगल, उज्वल नक्कीच.. स्वतावर, मित्रांवर विश्वास, पण तरीही खोल मनात दाटलेली भीती..
विषय sort -out झाला.. decision घेतला गेला.. आणि बोलता बोलता हळूहळू रूळ बदलत गेले.. मानसीला थोडे urgent काम होते.. ती बाहेर पडली.. आम्ही तिथेच त्या रूम च्या खिडकीतून बाहेर दिसणारे आकाश बघत बोलत बसलो होतो..  हळूहळू सूर्य अस्ताला जात होता आणि जसे आकाशात रंग उधळत गेले तसे विषय पण..
ओंकार नि प्रेम करावं भिल्लासारखं म्हणून दाखवली.. आनंद नाटकातले reference द्यायला सुरवात केली.. त्याच्या diary मधल्या कविता वाचून दाखवल्या.. जी कविता वाचून मानसी ओंकार ला भेटली ती वाचली.. त्याच्या बाबांच्या, बहिणीच्या कविता पण होत्या त्या वहीमध्ये.. एक एक कविता आणि ती लिहिली त्या वेळची परिस्थिती याविषयी गप्पा रंगल्या.. ओंकार च्या कविता छान होत्या खूप पण pessimist वाटल्या जरा.. मात्र  भाषेवर जोरदार command .. मनामधला एक एक दर्द जसा च्या तसा कागदावर उमटलेला.. ओंकार चे एक वेगळे रूप पाहायला मिळाले तेव्हा.. बाबांची कविता वाचताना.. त्यांना आठवताना हळवा होऊन डोळे मिटून खुर्चीत निशब्द बसलेला ओंकार..
हर्षदा ला म्हणालं तुझी पण कला बाहेर येऊ देत.. त्यावर ती जी काय लाजली.. जर शूट केलं असतं तर award winning .. ती म्हणाली मी लिहिलेल मला आत्ता आठवत नाहीये.. पण ज्या व्यक्तीला खोटं बोलता येत नाही तिने खरतर खोटं बोलू नये..
मी पण माझ्या कविता नव्याने वाचल्या.. आत्ता कळत होत परत वाचताना.. त्या वेळी माझ स्वतावर प्रेम होत.. स्वतावर विश्वास होता.. गेल्या काही दिवसात आयुष्य इतका mechanical आणि practical झाला आहे.. त्यात मन नावाची गोष्ट माळ्यावर टाकून दिली गेली आहे.. बसली आहे धूळ खात.. corporate मधली सगळयात निरुपयोगी गोष्ट.. college मध्ये वर्गात बसून पण समुद्रकिनारा दिसायचा डोळ्यासमोर.. आणि आता समुद्राकाठी वाळूत बसून पण फक्त office चा floor येतो डोळ्यासमोर.. कविता न सुचण्याच अजून एक कारण सापडल मला.. college मध्ये माझी कुठलीच कविता स्नेहल शिवाय पूर्ण नाही व्हायची आणि हल्ली आम्हाला दोघींना या विषयावर बोलायला वेळच नाही मिळत.. पण तरी मध्ये लिहिलं होत थोड.. ते वाचून जाणवला.. college पेक्षा शब्दावर प्रभुत्व वाढला आहे.. विचार प्रगल्भ झाले आहे आहेत..
हळूहळू आभाळ गडद होत चालल होत.. मैफिल तोडायची नाही म्हणून घरीच pizza order केला.. मानसी पण आलीच तेवढ्यात.. मग तिच्या समोर उजळणी केली सगळया विषयाची.. ओंकार च्या बाबांच्या diary मध्ये "मी माझा" fame गोखल्यांच्या चारोळ्या होत्या.. ते आणि त्याचे बाबा roommate .. so त्यांच्या publish ना झाल्येल्या पण चारोळ्या होत्या त्यात..  त्यातल्या काहीतर एकदम मनाच्या आरपार.. काही dialogs वाचून दाखवण्यासाठी ओंकार नटसम्राट आणि आनंद नाटकांची पुस्तकं शोधत होता.. आणि ती सापडली नाहीत म्हणून अस्वस्थ झाला होता..
सगळ्यात excellent गोष्ट घडली त्यानंतर.. मानसी आत जाऊन तिची diary घेऊन आली.. लग्नाला ४ वर्ष झाल्यावर ओंकार ला surprisingly शोध लागला होता कि आपली बायको पण सुरेख कविता करते.. तिची मृगजळ फार आवडली मला.. डोक्याची मंडई झाल्यावर ती वैकुंठात तिच एक झाड ठरलेल आहे तिथे जाते.. तिथे तिला शांतला मिळते मनाला.. आणि तिथेच बसल्यावर सुचत तिला.. फार सुरेख.. एकदम heart touching ...
हर्षदा च्या हातात पु. लंच मराठी वांग्मयाचा गाळीव इतिहास लागला होता हाताला..ती एकीकडे आमच बोलणं ऐकत होती.. एकीकडे तिला ते पुस्तकं पण संपवायचं होता.. किवा कदाचित.. तिच्या मनामध्ये विचारांचे खूप वादळ तयार झाले होते. आणि पुस्तकात डोकं घातल्यावर थोडा वेळ आपल्याशी कोणी जास्त बोलणार नाही, शांतपणे विचार करता येईल असं वाटत असाव तिला..
कणा, पृथ्वीचे प्रेमगीत, कोलंबसाचे गर्वगीत, चुकलो दिशा तरीही, पाऊलखुणा एक एक करत बर्याच कविता वाचल्या.. बर्याच गोष्टींची उजळणी झाली.. नास्तिक, मी गातो एक गाणे मधल्या काही कविता.. शाळेतल्या मराठीच्या वैद्य बाईंची आठवण झाली.. त्यानंतर चांगली कविता जिवंत असलेली गाणी ऐकली.. विंदा, कुसुमाग्रज, केशवसुत, सुरेश भट असे करत करत संदीप खरे, गुरु ठाकूर पर्यंत.. नाना पाटेकर, विंदांचे काही video पहिले.. विंदांची तेंच ते.. भारी.. संदीप खरे नि इकडून तिकडून आडवी उभी सगळी एक गोष्ट ची प्रेरणा तिथून घेतली असावी.. झाड, विश्वारंभ, ऐकता ऐकता मन हरवल.. "घेईन स्वप्नात" ऐकताना वाटलं खरच आता आपला कोणीतरी असावा "ज्याच्या नावाला आपल्या नावात घेता येईल".. रात्र सुंदर ऐकताना जी काय अनुभूती आली.. खरच ती रात्र सुंदर होती,.. ते गाणं त्या दिवशी जरा जास्तच appreciate केला गेला.. 
डोळे मिटायला लागले आणि समोरचा जरा धुकट दिसायला लागल्यावर लक्षात आला रात्रीचे ३ वाजून गेले.. दुपारी ४ ते रात्री ३.. एकच ठिकाणी बसून दिवस रात्रीचा चक्र बघत गप्पा रंगल्या होत्या.. एकदा कोणीतरी म्हणालं होत.. प्रत्येक वेळी कविता नवीन कळते.. परत एकदा त्याची जाणीव झाली. त्या एका दिवसात कितीतरी कवितांचे, शब्दांचे, नात्यांचे, माणसांचे अर्थ नव्यानी कळत होते.. आम्ही तिघी शाळेपासून बरोबर.. मैत्री रंगली college मध्ये असल्यापासून.. पण तरी असं जाणवला कि बर्याच गोष्टी, स्वभाव नव्यानी कळत आहेत..
त्या नंतर झोप लागलीच नाही.. सगळा दिवस परत डोळ्यासमोरून जात होता.. एवढा enjoy केलं होत आणि ते पण अशा वेळी ज्या वेळी least expected होत.. परत एकदा पुढच्या मैफिलीचा योग कधी येईल याची चर्चा करत घरी आलो..
वाटलं week -days तर mechanical जातातच त्याला काही करू शकत नाही आपण.. पण at least weekend fully enjoy केला पाहिजे.. अश्या अजून बर्याच मैफिलींची स्वप्न आहेत.. एक मैफिल फक्त music साठी.. कोणीतरी keyboard वर आणि त्याला साथ द्यायला आपली guitar .. एक मैफिल.. avenger drive करून leh -ladhakh ला घेऊन जायची आहे.. एक मैफिल.. cycle वर मस्त goa trip करायची आहे.. एक मैफिल रात्री आकाशातल्या ताऱ्यांकडे बघत गप्पात रंगवायची आहे.. एक मैफिल.. मस्त स्वयपाक करायचा सगळ्यांनी एकत्र गोंधळ घालत..  एक मैफिल.. रात्री start to end पुस्तक वाचायचं आहे.. एक मैफिल.. hopeless , topic less निव्वळ आचरटपणा करत पण तरीही endless discussions करत night out (जशी college मध्ये कायम मारली जायची.,. ) .. एक मैफिल.. highly techy discussions .. एक मैफिल अशा मित्रांबरोबर.. जिथे कुठलच मत पटत नाही.. सतत वाद होतात.. आपण जीव तोडून आपल मत पटवून देतो आणि नंतर मात्र दुसर्या बाजूचा विचार करतो आणि ती पण बाजू पटते आपल्याला..  आणि अजून असं बरच काही.. पण आता मात्र पुढच्या मैफिलीच्या वेळी कोणीतरी आपल पाहिजे असं वाटत.. या मैफिली खर्या अर्थाने पूर्ण करायला..