एक असा दिवस ज्या दिवशी तुम्ही खरच काही excitement expect नसते केलेली.. आणि त्याच दिवशी सगळा स्वर्ग तुमच्या समोर येऊन बसतो..
मी आणि हर्षदा मानसी-ओंकार च्या घरी गेलो होतो.. दुपारी साधारण ४ वाजले होते.. खरतर खूप serious , practical विषय discuss करायला भेटलो होतो.. within a single day एक आयुष्याला वेगळे वळण देणारा decision घ्यायचा होता.. पुढे काय माहित नाही.. काही तरी चांगल, उज्वल नक्कीच.. स्वतावर, मित्रांवर विश्वास, पण तरीही खोल मनात दाटलेली भीती..
विषय sort -out झाला.. decision घेतला गेला.. आणि बोलता बोलता हळूहळू रूळ बदलत गेले.. मानसीला थोडे urgent काम होते.. ती बाहेर पडली.. आम्ही तिथेच त्या रूम च्या खिडकीतून बाहेर दिसणारे आकाश बघत बोलत बसलो होतो.. हळूहळू सूर्य अस्ताला जात होता आणि जसे आकाशात रंग उधळत गेले तसे विषय पण..
ओंकार नि प्रेम करावं भिल्लासारखं म्हणून दाखवली.. आनंद नाटकातले reference द्यायला सुरवात केली.. त्याच्या diary मधल्या कविता वाचून दाखवल्या.. जी कविता वाचून मानसी ओंकार ला भेटली ती वाचली.. त्याच्या बाबांच्या, बहिणीच्या कविता पण होत्या त्या वहीमध्ये.. एक एक कविता आणि ती लिहिली त्या वेळची परिस्थिती याविषयी गप्पा रंगल्या.. ओंकार च्या कविता छान होत्या खूप पण pessimist वाटल्या जरा.. मात्र भाषेवर जोरदार command .. मनामधला एक एक दर्द जसा च्या तसा कागदावर उमटलेला.. ओंकार चे एक वेगळे रूप पाहायला मिळाले तेव्हा.. बाबांची कविता वाचताना.. त्यांना आठवताना हळवा होऊन डोळे मिटून खुर्चीत निशब्द बसलेला ओंकार..
हर्षदा ला म्हणालं तुझी पण कला बाहेर येऊ देत.. त्यावर ती जी काय लाजली.. जर शूट केलं असतं तर award winning .. ती म्हणाली मी लिहिलेल मला आत्ता आठवत नाहीये.. पण ज्या व्यक्तीला खोटं बोलता येत नाही तिने खरतर खोटं बोलू नये..
मी पण माझ्या कविता नव्याने वाचल्या.. आत्ता कळत होत परत वाचताना.. त्या वेळी माझ स्वतावर प्रेम होत.. स्वतावर विश्वास होता.. गेल्या काही दिवसात आयुष्य इतका mechanical आणि practical झाला आहे.. त्यात मन नावाची गोष्ट माळ्यावर टाकून दिली गेली आहे.. बसली आहे धूळ खात.. corporate मधली सगळयात निरुपयोगी गोष्ट.. college मध्ये वर्गात बसून पण समुद्रकिनारा दिसायचा डोळ्यासमोर.. आणि आता समुद्राकाठी वाळूत बसून पण फक्त office चा floor येतो डोळ्यासमोर.. कविता न सुचण्याच अजून एक कारण सापडल मला.. college मध्ये माझी कुठलीच कविता स्नेहल शिवाय पूर्ण नाही व्हायची आणि हल्ली आम्हाला दोघींना या विषयावर बोलायला वेळच नाही मिळत.. पण तरी मध्ये लिहिलं होत थोड.. ते वाचून जाणवला.. college पेक्षा शब्दावर प्रभुत्व वाढला आहे.. विचार प्रगल्भ झाले आहे आहेत..
हळूहळू आभाळ गडद होत चालल होत.. मैफिल तोडायची नाही म्हणून घरीच pizza order केला.. मानसी पण आलीच तेवढ्यात.. मग तिच्या समोर उजळणी केली सगळया विषयाची.. ओंकार च्या बाबांच्या diary मध्ये "मी माझा" fame गोखल्यांच्या चारोळ्या होत्या.. ते आणि त्याचे बाबा roommate .. so त्यांच्या publish ना झाल्येल्या पण चारोळ्या होत्या त्यात.. त्यातल्या काहीतर एकदम मनाच्या आरपार.. काही dialogs वाचून दाखवण्यासाठी ओंकार नटसम्राट आणि आनंद नाटकांची पुस्तकं शोधत होता.. आणि ती सापडली नाहीत म्हणून अस्वस्थ झाला होता..
सगळ्यात excellent गोष्ट घडली त्यानंतर.. मानसी आत जाऊन तिची diary घेऊन आली.. लग्नाला ४ वर्ष झाल्यावर ओंकार ला surprisingly शोध लागला होता कि आपली बायको पण सुरेख कविता करते.. तिची मृगजळ फार आवडली मला.. डोक्याची मंडई झाल्यावर ती वैकुंठात तिच एक झाड ठरलेल आहे तिथे जाते.. तिथे तिला शांतला मिळते मनाला.. आणि तिथेच बसल्यावर सुचत तिला.. फार सुरेख.. एकदम heart touching ...
हर्षदा च्या हातात पु. लंच मराठी वांग्मयाचा गाळीव इतिहास लागला होता हाताला..ती एकीकडे आमच बोलणं ऐकत होती.. एकीकडे तिला ते पुस्तकं पण संपवायचं होता.. किवा कदाचित.. तिच्या मनामध्ये विचारांचे खूप वादळ तयार झाले होते. आणि पुस्तकात डोकं घातल्यावर थोडा वेळ आपल्याशी कोणी जास्त बोलणार नाही, शांतपणे विचार करता येईल असं वाटत असाव तिला..
कणा, पृथ्वीचे प्रेमगीत, कोलंबसाचे गर्वगीत, चुकलो दिशा तरीही, पाऊलखुणा एक एक करत बर्याच कविता वाचल्या.. बर्याच गोष्टींची उजळणी झाली.. नास्तिक, मी गातो एक गाणे मधल्या काही कविता.. शाळेतल्या मराठीच्या वैद्य बाईंची आठवण झाली.. त्यानंतर चांगली कविता जिवंत असलेली गाणी ऐकली.. विंदा, कुसुमाग्रज, केशवसुत, सुरेश भट असे करत करत संदीप खरे, गुरु ठाकूर पर्यंत.. नाना पाटेकर, विंदांचे काही video पहिले.. विंदांची तेंच ते.. भारी.. संदीप खरे नि इकडून तिकडून आडवी उभी सगळी एक गोष्ट ची प्रेरणा तिथून घेतली असावी.. झाड, विश्वारंभ, ऐकता ऐकता मन हरवल.. "घेईन स्वप्नात" ऐकताना वाटलं खरच आता आपला कोणीतरी असावा "ज्याच्या नावाला आपल्या नावात घेता येईल".. रात्र सुंदर ऐकताना जी काय अनुभूती आली.. खरच ती रात्र सुंदर होती,.. ते गाणं त्या दिवशी जरा जास्तच appreciate केला गेला..
डोळे मिटायला लागले आणि समोरचा जरा धुकट दिसायला लागल्यावर लक्षात आला रात्रीचे ३ वाजून गेले.. दुपारी ४ ते रात्री ३.. एकच ठिकाणी बसून दिवस रात्रीचा चक्र बघत गप्पा रंगल्या होत्या.. एकदा कोणीतरी म्हणालं होत.. प्रत्येक वेळी कविता नवीन कळते.. परत एकदा त्याची जाणीव झाली. त्या एका दिवसात कितीतरी कवितांचे, शब्दांचे, नात्यांचे, माणसांचे अर्थ नव्यानी कळत होते.. आम्ही तिघी शाळेपासून बरोबर.. मैत्री रंगली college मध्ये असल्यापासून.. पण तरी असं जाणवला कि बर्याच गोष्टी, स्वभाव नव्यानी कळत आहेत..
त्या नंतर झोप लागलीच नाही.. सगळा दिवस परत डोळ्यासमोरून जात होता.. एवढा enjoy केलं होत आणि ते पण अशा वेळी ज्या वेळी least expected होत.. परत एकदा पुढच्या मैफिलीचा योग कधी येईल याची चर्चा करत घरी आलो..
वाटलं week -days तर mechanical जातातच त्याला काही करू शकत नाही आपण.. पण at least weekend fully enjoy केला पाहिजे.. अश्या अजून बर्याच मैफिलींची स्वप्न आहेत.. एक मैफिल फक्त music साठी.. कोणीतरी keyboard वर आणि त्याला साथ द्यायला आपली guitar .. एक मैफिल.. avenger drive करून leh -ladhakh ला घेऊन जायची आहे.. एक मैफिल.. cycle वर मस्त goa trip करायची आहे.. एक मैफिल रात्री आकाशातल्या ताऱ्यांकडे बघत गप्पात रंगवायची आहे.. एक मैफिल.. मस्त स्वयपाक करायचा सगळ्यांनी एकत्र गोंधळ घालत.. एक मैफिल.. रात्री start to end पुस्तक वाचायचं आहे.. एक मैफिल.. hopeless , topic less निव्वळ आचरटपणा करत पण तरीही endless discussions करत night out (जशी college मध्ये कायम मारली जायची.,. ) .. एक मैफिल.. highly techy discussions .. एक मैफिल अशा मित्रांबरोबर.. जिथे कुठलच मत पटत नाही.. सतत वाद होतात.. आपण जीव तोडून आपल मत पटवून देतो आणि नंतर मात्र दुसर्या बाजूचा विचार करतो आणि ती पण बाजू पटते आपल्याला.. आणि अजून असं बरच काही.. पण आता मात्र पुढच्या मैफिलीच्या वेळी कोणीतरी आपल पाहिजे असं वाटत.. या मैफिली खर्या अर्थाने पूर्ण करायला..
No comments:
Post a Comment