Showing posts with label शेर. Show all posts
Showing posts with label शेर. Show all posts

Sunday, June 7, 2020

आरसा

गर्दीत धावणारा तो चेहरा बोलका होता.. 
फडताळावर चिकटवलेला त्याचा आरसा पोरका होता.. 

आभाळ

हे जीवनाचे सार सारे सांगते आभाळ माझे..
कातरवेळी डोळ्यातून दाटते आभाळ माझे.. !! 

कवीचे आयुष्य

 प्रत्येक लिहिलेली कविता, कवी जगतोच असे नाही.. 
मरणावरही लिहितो तो, म्हणजे मरतोच असे नाही.. 


सरण

एक भास, एक श्वास, शेवटी मरण इतकंच.. 
एक दाह, एक देह, शेवटी सरण इतकंच..