कॉलेज ची preparatory leave.. दिवसभर अभ्यास करून संध्याकाळी मी आणि केतकी बाहेर पडलो.. तिच्या घरासमोर एक गाडा.. रोज संध्याकाळी ५ वाजता.. छप्पर तोड भजी बनवणाऱ्या आजी.. माझा आणि केतकी चा सोपा प्लॅन होता.. घरातून बाहेर.. भजी प्लेट पोटात.. तिथून तळजाई evening walk.. तृप्त कार्यक्रम.. रात्रभर जागरण करून अभ्यास करायला शरीराला एवढं इंधन पाहिजेच.. पण घोळ घातले नाहीत तर ते आम्ही मित्र कसले..
खाली उतरलो.. आजी गैरहजर.. विरलेले स्वप्न घेऊन आम्ही दोघी तळजाई वर चालत सुटलेल्या.. वाटेत असताना अज्या आणि चिटस् चा फोन.. त्यांना सांगितले आजी आल्या असतील तर भजी घेऊन या इकडे.. गप्पा मारत खाता येतील.. दहा मिनिटात एक मोटर सायकल.. त्यावर हऱ्या नाऱ्या.. हातात द्रोणगिरी सारखी भजी प्लेट.. मिशन फत्ते..
रस्त्याच्या मध्येच कुठे खाणार.. म्हणून गाडी थोडी कडेला लावली त्यांनी आणि आम्ही आपले कडेच्या दगडावर बसलो गप्पा मारत.. भजी खायला पहिले भजे उचलणार.. इतक्यात पोलिस.. काय रे इथे काय करताय? म्हणलं भजी खातोय सर.. आम्हाला आधी कळलं नाही भजी खाण्यात कसला प्रॉब्लेम..
मग त्यांच्या प्रश्नांच्या सरबत्ती वरून लक्षात आले.. दोन मुले दोन मुली झाडाच्या कडेला बसून काहीतरी गुलगुलू करतात का काय असा काहीसा चेहरा दिसला त्यांचा.. आता हे नवीनच काहीतरी.. आम्ही आपले एक लडका एक लाडकी सिर्फ दोस्त हो सकते हैं.. वगैरे समजून द्यायच्या इमानदार प्रयत्नात.. आम्ही आपले प्रामाणिक पणे इथे आत्ता जसे लिहिले तसे सगळे कथन केले.. तरी त्यांचे समाधान होई ना.. चार माणसात एक बाईक कशी.. दुसरी गाडी कुठेय.. प्रश्न खूप.. आता काय सांगावं की आम्ही दोघी वॉक ला आलो होतो, वॉक ला गाडी कशी न्यावी बुवा.. प्रॉब्लेमच प्रॉब्लेम.. सगळेच गोंधळ गोंधळ.. शेवटी खूप हतबल झालेले आम्ही कसे तरी समजावले त्यांना.. मग पोलिसांनी आम्हाला इकडे अशात खूप जोड्या येऊन बसायला लागल्या आहेत म्हणून राऊंड ला आलो वगैरे सांगितले.. थोडेसे वडीलधाऱ्या नात्याने बौध्दीक पण दिले जे की आम्हाला मनापासून पटले..
एव्हाना ते भजे थंड होऊन घशात उतरण्याच्या पलीकडे गेले होते.. ज्यासाठी केला होता अट्टाहास! पोलिसांच्या नजरेसमोर आम्ही तळजाई उतरायला घेतली..
खाली उतरत उतरत असताना एक खरोखरच गाडी रस्त्याच्या कडेला थांबलेली दिसली.. खरोखरच लव बर्डस जोडी होती ती.. अरे पोलिसांचा wrong number लागला ना भाऊ.. ते यांच्यासाठी आले होते तर.. आम्ही काही कमी अतरंगी थोडेच आहोत.. जाता जाता पुण्याचे काम करत असतो आपण.. "अहो पोलिस मामा शुक शुक.. हेच ते ज्यांना तुम्ही शोधत होतात.. आजींच्या भज्याची शप्पथ!!!"
ताजा कलम - या कथेतली नावं खरी आहेत.. ज्यांच्यावर मनापासून विश्वास टाकावा असे हे मित्र.. मैत्री मध्ये इतर काही फालतू गोष्टी न आणणारे.. बस की आयुष्यात अजून काय पाहिजे..
उद्या परत भेटेन.. मैत्रीच्या वेगळ्या पैलू सोबत..
-- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment