Monday, May 31, 2021

Blood donation (बंध मैत्रीचे - ३)

प्रीतम कुलकर्णी. m.tech च्या धमाल मित्रांपैकी हा एक. प्रत्येक गोष्टीला दोन मते असतात आणि ती एकदम north pole, south pole सारखी एकदम विरुद्ध दोन टोके. हे आमच्या दोघांकडे बघून सगळ्यांना पटले असेल कॉलेज मध्ये. इतके प्रचंड आम्ही भांडायचो, अजून पण भांडतो. प्रत्येक गोष्टीत अरे ला कारे झालेच पाहिजे, नाहीतर प्रीतम भेटल्यासारखे वाटत नाही. बारा वर्षांच्या या मैत्रीत काल पहिल्यांदा एकमत झाले. न भांडता पहिल्यांदाच केलेली गोष्ट. सत्कारणी लावलेला रविवार - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या blood donation drive मध्ये केलेले मतदान. 

Pandemic च्या काळात blood donation हे आपले सामाजिक कर्तव्य आहे आणि आपण ते बजावले पाहिजे. आपल्याकडे दान करायला पैसे असतीलही, नसतील ही. पण दान करायला रक्त नक्की आहे. येत्या एक वर्षामध्ये प्रत्येकाच्या कुटुंबाने या ना त्या प्रकारे आजारपणाला तोंड दिले. येणारे दिवस अजून काय रंग दाखवतील काय माहित. या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त किंमत कोणाची कळली असेल तर आपल्याला फुकट oxygen देणारी झाडे आणि अडीनडीला रक्त लागल्यावर ते देणारे रक्तदाते. 

Blood donation ची ही काही पहिली वेळ नाही, या आधी कधी लिहावे वाटले नव्हते. पण आज वाटले. ते याच साठी, की सध्या खूप गरज आहे. आणि खूप कमी लोक सध्या एलिजिबल आहेत. काहींनी लस घेतली आहे म्हणून, काहींना करोना होऊन गेला आहे म्हणून. काहींना तब्बेतीचे त्रास आहेत म्हणून. काही वयामुळे इच्छा असून करू शकत नाहीत म्हणून. काही जण घाबरून डोनेशन ला घराबाहेर पडत नाहीयेत म्हणून. 

ही पोस्ट लिहिण्यामागे माज करते वाटले तर तसे समजा, आवाहन करते वाटले तर तसे समजा. जे समजायचे ते समजा. पण मनापासून हात जोडून केलेल्या विनंतीचा एकदा मनापासून विचार नक्की करा. तंदुरुस्त व्यक्तींनी अवश्य रक्तदान करा!! तुमचे फोटो सोशल मीडिया वर टाकून बाकी मित्रांना पण प्रोत्साहन देत रहा. 

-- अवनी गोखले टेकाळे 


No comments:

Post a Comment