Wednesday, June 2, 2021

ऐलतीर.. पैलतीर..

एक जमीन.. एक आकाश
ऐलतीर.. पैलतीर..
कातर वेळेला अवकाश
सुटत चाललेला धीर..

ऐलतीर.. पैलतीर
एक क्षितिज.. एक भेट
काजळ भरला नयनतीर
भिडलेली नजर थेट..

एक वाळू.. एक शिंपला
सागराला आलेली भरती
क्षितिजापाशी खेळ रंगला
आकाशाला भिडली धरती..

--अवनी गोखले टेकाळे

2 comments: