मनाला मरगळ यायला लागली की सगळी हातातली कामं बाजूला ठेवायची आणि मस्तपैकी मसाले भाजायला घ्यायचे. जादू असते या वासात. रंध्रारंध्रात बसलेली मरगळ बाहेर पडून तिथे भाजलेले रानटी वेलदोडे, सुंठ, हळकुंड, लवंग यांचा सुगंध जाऊन बसतो. आणि मसाला पूर्ण होईपर्यंत आपण परत स्वच्छंदी होऊन जातो. आणि एक काम होऊन जाते ते वेगळेच. अरोमा थेरपी अजून वेगळी काय असते?
पुढचा सुपरहिट प्रयोग - कांदा लसूण मसाला. कुठल्याही कृत्रिम रंग, भेसळ, प्रेझर्व्हेटिव्ह शिवाय बनवलेला हा मसाला वर्षभर टिकतो. हा मसाला बनवायला लागणारे अर्धे खडे मसाले तर आपल्या घरात सहज असतातच.. तर खाली दिलेले पदार्थ वेगळे वेगळे तेलामध्ये परतून घ्यायचे.. आणि मग सगळे मिक्सर मधून दळायचे.. कि झाला मसाला घरच्या घरी तयार..
एक किलो कांदा
शंभर ग्रॅम लसूण
धने २०० ग्रॅम..
कोरडे खोबरे पाव किलो..
तीळ ५० gm
सुकी मिरची पाव किलो..
हळकुंड
खडा हिंग
जिरे १०० ग्रॅम
शाह जिरे २० ग्रॅम
दगड फूल २० ग्रॅम
जावित्री २० ग्रॅम
मिरे २० ग्रॅम
लवंग २० ग्रॅम
दालचिनी २० ग्रॅम
तमाल पत्र २० ग्रॅम
मसाला वेलदोडे २० ग्रॅम
सुंठ २० ग्रॅम
बदामफूल २० ग्रॅम
जास्त प्रमाणात मसाला करत असू तर कांडप वाल्याकडून दळून आणता येतो.. किंवा घरी मिक्सर मध्ये पण छान बारीक मसाला दळला जातो.. फक्त मिक्सर मध्ये करणार असाल तर सोपे जावे म्हणून काही बदल करू शकता जसे कि सुकी मिरची, हळकुंड आणि खडा हिंग याच्या ऐवजी घरातले हळद, तिखट आणि हिंग गरम करून घालू शकतो.. तसेच गोटा खोबरे बऱ्याच वेळा खऊट निघते तर त्याच्या ऐवजी desiccated coconut वापरू शकतो..
एकदा नक्की करून बघा.. आणि aroma therapy कशी वाटते ते सांगा नक्की..
तुम्हाला माझे स्वयंपाक घरातले प्रयोग आवडत असतील तर माझ्या ब्लॉग च्या उजव्या भागामध्ये labels देऊन लेखांचे वर्गीकरण केलेले आहे. त्यातील "जाऊ तिथे खाऊ" यावर क्लिक करून सगळे लेख वाचू शकता. जाऊ म्हणजे आमच्या सुगरण जावा बरंका. ज्यांच्या प्रोत्साहनामुळे वेगळे वेगळे प्रयोग करून बघायची ऊर्जा मिळते.
-- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment