Tuesday, March 30, 2021

ताकातली सोलकढी (षड रस रसनेचे - आंबट - ३)

कैरी, चिंच यानंतर पुढचा आंबट पदार्थ घेऊन येत आहे. कोकम. मूळ रेसिपी मधला मुख्य घटक म्हणजे नारळाचे दूध. पण work from home आणि work for home हे दोन्ही म्हणजे तारेवरची कसरत. गडबडीची वेळ. त्यात कोकम भिजत घालावे, नारळाचे दूध काढावे म्हणजे जरा वेळखाऊ किचकट काम. त्यामुळे दुधाची तहान ताकावर म्हणत थोडा रेसिपी मध्ये सोपा ट्विस्ट. ताकातली सोलकढी. 

दही घुसळून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घाला. त्यात तयार कोकम आगळ घाला. मीठ, साखर, किसलेले आले, जिरेपूड, चिरलेली कोथिंबीर घाला. मुलगी लहान असल्यामुळे मी हिरवी मिरची घातली नाही पण आवडत असेल तर मिक्सर ला हिरची मिरची, आले, कोथिंबीर असे फिरवून घालू शकता. 

नाश्ता झाल्यावर अकरा वाजता तहान तहान होते तेव्हा प्यायला चांगला प्रकार आहे हा. किंवा जेवणात पण घेऊ शकता. पाहुणे आले की welcome drink म्हणून देऊ शकता. 

त्याचे काय आहे उन्हाळ्यात सुद्धा cold drink च्या बाटल्या न पिणारे काही वेडे आहेत या जगात अजून पण. आम्ही त्यातलेच. मग गरमी मध्ये असे काय काय करत बसायचे घरी. तुम्ही आमच्या वेडेपणा मध्ये सहभागी होणार का? कोल्ड ड्रिंक पेक्षा हे पिऊन बघणार का? नक्की करून बघा. 

- अवनी गोखले टेकाळे


No comments:

Post a Comment