आपल्याला तर हेच सोपं वाटत बघा.. म्हणजे त्या vitamin C च्या गोळ्या घेण्यापेक्षा आपलं व्हिटॅमिन सी वाले पेय पदार्थ आहारात घ्यायचे भरपूर..लिंबू सरबत, कधी चिंचेचं सार, पन्हं, रस्सम, कधी कैरीच पन्हं, कधी अमसुलाचे सरबत, सार, सोलकढी, कधी जांभळाचे सार किंवा सरबत, टोमॅटो चे सार, कढी, ज्वारीचे किंवा नाचणीचे आंबील, आवळ्याचे सरबत, जांभूळ सरबत, करवंदाचे सरबत.. आणि बरच काय काय.. रोज एक प्रकार केला तरी दोन आठवडे असे झटपट जातील.. सहा रसात आंबट वर पहिला जोर द्यायचं हे पण एक कारण आहेच सध्या..
तर आता येऊ चिंचेचं पन्हं.. हे जर प्यायल नसेल तर एका स्वर्गीय चवी पासून तुम्ही अनभिज्ञ आहात अजून. वाचता वाचता घ्याच करायला.. फार अवघड कलाकुसर काही नाही.. गाभुळलेली चिंच थंड पाण्यात भिजत घाला.. जेवढी चिंच तेवढा गुळ चिरून घ्या. काकवी असेल घरात तर अजून छान, गुळापेक्षा पटकन एकजीव होते आणि गूळ चिरायचे पण कष्ट वाचतात.(गूळ चिरण्या पेक्षा नंतर त्या सुरीचे जे लडबडून हाल होतात ते खरं तर नको वाटतात) चिंचेचा कोळ, गूळ, जिरे पूड आणि थोड पिंक salt असेल तर नसेल तर साधं मीठ थोड चालतंय, थोडी वेलची पावडर आणि थंडगार पाणी घालून पन्हं सारखे करा..
-- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment