To be or not to be. Buy call or sell put? Bullish or bearish? Blog चा आजचा विषय "अर्था"तच. जगातली super charming गोष्ट. nifty index candles.!! Intraday options trading.!!!
तर. Derivatives या शब्दाने जो अकरावी मध्ये पिच्छा पुरवायला सुरुवात केली ते कॉलेज च्या शेवटच्या वर्षा पर्यंत. आणि आता मात्र ट्रेडिंग करायला लागल्यावर वाटतंय आपणच त्याचा पिच्छा पुरवावा. जगण्याचा "अर्थ". पैसा. अनेक हौशींपेकी एक intraday trading आणि आता रोजचा अविभाज्य भाग. पैसा कमवायचा. मध्यम वर्गीय माणसासारखा हळूहळू साठवायचा. मान्य. ते तर होत राहीलच. पण या वयात vibrant, most volatile market मध्ये हात नाही धुतले तर काहीतरी adventure miss केल्यासारख आहे.
Intraday options trading. Technical analysis सोबतच तोंडी पाढे, तोंडी बेरीज वजाबाकी, ग्राफचा व्यवस्थित अभ्यास, डायरेक्ट प्रपोर्शन वरती पकड जर असेल तर आणि तरच इकडे घुसायला हरकत नाही. नाहीतर मग तळ न सापडणारी खोल विहीर म्हणून सोडून द्यावे. किती गर्तेत जायला लागेल सांगता येत नाही. पण ज्याला maths आवडते अशा माणसाने नक्की प्रेमात पडावे असा खूप सुंदर प्रकार म्हणजे derivatives - options.
Trading चे ढोबळ मानाने प्रकार दोन. Equity आणि Derivatives. Derivatives मध्ये प्रकार दोन options and futures. Options म्हणजे थोडक्यात समजून उमजून अभ्यास करून मग केलेले technical prediction. खतरों के खिलाडी फक्त इथे पोचतात.
एखाद्या share ची किंमत 900 रुपये आहे आपल्याला वाटत आहे की येणाऱ्या expiry cycle पर्यंत हा share 950 रुपये होईल तर तो झाला 950 call option. आणि किंमत उतरून 850 होईल तर तो झाला 850 put option. जर आपले prediction बरोबर दिशेने गेले तर त्या proportion मध्ये आपल्याला profit होतो.
काही लोक म्हणत असतात की मार्केट उतरल्यावर आम्हाला फायदा झाला ते put option घेतलेले लोक असतात. हे लोक जेव्हा संख्येने वाढतात तेव्हा मार्केट bearish दिशेने जायला लागते. (For same index, if open interest put / open interest call ratio greater than one then - market going into bearish direction)
Thumb rule एकच. कोणाचाच सल्ला ऐकायचा नाही. वेगवेगळे YouTube वाले, ब्लॉग वाले, न्यूज वाले. हे फक्त त्यांचा trp वाढवत असतात. आपला प्रॉफिट नाही. आपला प्रॉफिट वाढवायला फक्त option chain, open interest चा chart, आणि candles graph 📈 📉 हे आणि हेच साथ देतात. दुसरा thumb rule आपला एक ट्रेड 2-5 मिनिटात संपवून टाकायचा. शेवटचा thumb rule. सोन्याचे अंड देणारी कोंबडी आहे ही. पण ती एका दिवसात मारून चिकन तंदुरी करून खाऊन नाही टाकायची. आणि ती सारखेच अंड देईलच अशी पण अपेक्षा नाही करायची. तिचा पण mood आणि fertile period असतोच की. बाकी सुज्ञास अधिक सांगणे न लगे.
यात शिकण्यासारखे खूप काय काय आहे. Head and shoulder pattern आणि butterfly Technique आपले सोपे सोपे आणि त्यातल्या त्यात खात्रीशीर. Support, resistance, premium, time value, monthly expiry, weekly expiry, lot size. बरच खोलात सांगण्यासारख आहे. पण सगळे एकदम एका ब्लॉग मध्ये लिहिले तर उद्या काय लिहू?
कुठला ट्रेड टाकायचा ते आपला आपला अभ्यास करून ठरवा. पण जाता जाता एकच माझा स्वतः चा अनुभव. Income च्या पाच टक्के ट्रेडिंग आणि Portfolio च्या दहा टक्के फक्त ऑप्शन मध्ये खेळवायला ठेवायचे. आपल्या पगारात होम लोन , शाळेची फी भरायची आहे आणि सोबतच पूर्ण घर चालवायचे आहे हे लक्षात ठेऊन काय ते खेळायचे म्हणजे झालं. पण तेवढे मात्र करून बघायचेच. केक वरची चेरी नाही खाल्ली तर केक खाण्यात काय मजा!!!
Inspire होऊन करून बघा. तुमचे experience share करत रहा. एकमेकांना सावध करत रहा. अनुभव सांगत रहा. टिप्स देत रहा. तुम्हाला काय वाचायला आवडेल ते सांगत रहा. आणि पैशाचे नीट नियोजन करायला विसरू नका. Basic आहे ते..!!
ता. क. ट्रेड हुकला तर त्या दिवशी असे ब्लॉगिंग मधून पैसे वळते करायला काही हरकत नाही 😅 ब्लॉगिंग मधून पैसे कसे मिळतात? ते पुढच्या वेळी..
-- अवनी गोखले टेकाळे
अवघड विषय!
ReplyDelete