आपण सोशल मीडिया वर फोटो अपलोड करतो त्याचे काही तोटे होऊ शकतात का? हो. होऊ शकतात. Deepfake technique मध्ये असेच फोटो, व्हिडीओ चुकीच्या कारणांसाठी वापरले जातात. काय आहे deepfake? सोप्या मराठी भाषेत समजून सांगणार आहे या ब्लॉग मध्ये. रामायणातील मारीच राक्षसाचे उदाहरण वापरून.
पुराण काळात अनेक मायावी राक्षस घडून गेले. त्यातला एक लक्षात राहिलेला मायावी राक्षस म्हणजे मारीच राक्षस. पूर्ण रामायण घडायला कारणीभूत असणारी घटना म्हणजे सीता हरण. आणि तिला कारणीभूत मायावी राक्षस म्हणजे मारीच. ज्याने सुवर्णमृगाचे रूप धारण केले आणि तिथून पुढे घडलेले रामायण आपल्याला माहित आहेच. हे मायावी राक्षस नेहमीच वाईट हेतू साठी दुसरे रूप, आवाज धारण करायचे. सोज्वळतेच्या, सभ्यतेच्या बुरख्याआड दडलेले कुकर्म करणारे हे राक्षस.
असे मायावी राक्षस आजच्या जगात पण आहेत. ते कोणाचे रूप धारण करू शकतात? कोणाचा आवाज धारण करू शकतात? तर ज्यांचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडिया वर अपलोड केलेले आहे अशा कोणाचेही. machine learning आणि artificial intelligence चे हे एक powerful technique. हे कुठली वाईट कृत्य करू शकते? तर अश्लील व्हिडीओ बनवणे, फेक news बनवणे, पैशाची अफरातफर करणे असे बरेच काही.
त्यांना कुठून मिळतो डेटा? तर आपणच नाही का देत सहज पणाने. कधी नथीचा नखरा, कधी नऊ रंगांच्या नऊ साड्यांमधले फोटो, कधी आपल्या कुटुंबाचे फोटो, कधी हौस म्हणून आपल्या आवाजात सादर केलेले एखादे गाणे. तुम्हीच शोधून बघा सोशल मीडिया वरच्या आपल्या वावरातून आपण किती फोटो, ऑडिओ, व्हिडीओ अपलोड केले आहेत ते. तसेच कुठलेतरी पांचट गेम येत असतात फेसबूक वरती. तुम्ही म्हातारपणी कसे दिसाल, तुम्ही मागच्या जन्मात कोण होतात, आम्ही ओळखू शकतो तुमचा स्वभाव, आणि बरेच काही. असले गेम कृपा करून खेळू नका. त्यात नकळत आपली खूप माहिती त्या ऍप वाल्यांकडे जाते. आता तुम्ही शंभर पोस्ट पैकी नव्वद पोस्ट वर भांडणे उकरून काढून कंमेंट केल्या असतील तर तुमचा स्वभाव रागीट वाटणार. त्यासाठी ऍप आणि गेम कशाला पाहिजे? तेवढे तर आम्ही पण घर बसल्या सांगू शकतो की तुम्हाला. आणि परत त्यांनी किती खरेखरे ओळखले अशा कॉमेंट करून त्या ऍप ला धन्यवाद, पाच स्टार देऊन परत तुम्ही ते results फेसबुक वर पोस्ट करता. आता बोला.
परत एकदा सायबर च्या विळख्यात मध्ये अधोरेखित केलेली गोष्ट सांगू इच्छिते. की एकदा मोबाइल चा नेटपॅक ऑन केला की काहीच private नसते. प्रत्येक क्षणाला आपल्याला कोणीतरी वाचू शकते. घाबरायचे नाही. पण सतर्क राहायचे. जागरूक पणाने नवीन गोष्टी समजून घ्यायच्या. आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा एकदा सारासार विचार करायचा. खरंतर हे माहित नसते असेही नाही. पण हौस आणि गांभीर्य यात बहुतेक हौस वरचढ ठरते हे मात्र खरे.
तुम्हाला अशा अजून कुठल्या गोष्टींविषयी वाचायला आवडेल ते कंमेंट मध्ये सांगा. पुढच्या ब्लॉग मध्ये त्यावर लिहायचा प्रयत्न करेन. सायबर च्या विळख्यात या लेबल खाली या विषयावरील सर्व लेख एकत्रित करत आहे. वाचू शकता खालील लिंक चा वापर करून.
-- अवनी गोखले टेकाळे
Khup chan sangitale ahe!!👌👌👌👌
ReplyDeleteखूपच छान माहिती 👌👌
ReplyDeleteVery useful and informative blog
ReplyDelete