Thursday, October 7, 2021

Data Mining (Cyber च्या विळख्यात - २)

नमस्कार मित्रांनो. या नवरात्रात एक अनोखा उपक्रम. Information Technology तुमच्या आमच्या आयुष्याचा नकळत भाग झालीच आहे. तर तिला सन्मानाने स्वीकारू या. जे वापरत आहोत त्याचा अर्थ समजून घेऊ या. मराठीत खूप कमी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे सोप्या भाषेत  प्रत्येक माळेला एका नवीन विषयाची मराठीत थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि दसऱ्याला सीमा उल्लंघन करून पुढचे पाऊल टाकायला सज्ज होऊया.  

Mining चा मराठीत अर्थ खाणकाम करून उपयुक्त वस्तू मिळवणे. ही आहे आपल्या माहितीची खाण. वेगवेगळ्या सोशल मीडिया वरती आपली माहिती सेव्ह होते त्याची खाण. एक माणूस, एक घटना म्हणजे एक डेटा. असे करोडो डेटा एकत्र येऊन तयार होतो तो database. आणि याच्या अभ्यासातून, याच्या mining मधून तयार होतात वेगवेगळे नियम. 

Data mining मधली दोन उदाहरणे सांगतो. खरीखुरी घडलेली. कुठे ना कुठे वाचलेली. अभ्यासलेली. अर्थ, निष्कर्ष ज्याला जसे लावता येतील तसे लावावेत. 

एक आटपाट नगर. नगरात एक जोडपे. त्यांना एक कॉलेज मध्ये जाणारी मुलगी. घराजवळ general store. कायम खरेदी तिथेच. अचानक store मधून त्यांना प्रेग्नन्ट बायकांविषयी प्रबोधन करणारी, आवश्यक असणाऱ्या वस्तूंना अधोरेखित करणारी पॅम्प्लेट्स घरी यायला लागली. Pregnant कोण? आई का कॉलेज मध्ये जाणारी मुलगी? शक्यता दोघींची नव्हती. त्यांनी कंप्लेंट केली. पॅम्प्लेट्स बंद करायला लावली. Store वाले confident. माहिती चुकीची? शक्यच नाही. आम्ही पक्क्या माहिती च्या आधारावर बोलतो, तुम्ही खात्री करून घ्या. आणि थोडक्या दिवसात कॉलेज मध्ये जाणारी मुलगी प्रेग्नन्ट असल्याचे लक्षात आले. घरच्यांना कळण्याच्या आधी store वाल्यांना कळलेच कसे? Data mining जगतातील खळबळ उडवून देणारी घटना. Data mining Algorithms चा effectiveness prove करणारी घटना. तर झाले काय होते? Store मध्ये खरेदी ला आलेल्या व्यक्तींचा आणि खरेदी केलेल्या वस्तूंचा एक पॅटर्न बनवला जायचा. त्यावरून rules तयार केले जायचे आणि परत तो व्यक्ती खरेदी ला आल्यावर काय खरेदी करेल याचे आडाखे बांधले जायचे. त्या pattern मधून लक्षात आले होते की pregnant ladies च्या section मध्ये नकळत ती मुलगी रेंगाळत होती. 

दुसरे सोपे उदाहरण द्यायचा प्रयत्न करते. आपण बर्गर खायला हॉटेल मध्ये गेलो. तिथे आपल्याला वेगवेगळे combo packs दिसतात. बर्गर सोबत fries आणि cold drink असा अतिशय कॉमन combo pack दिसेल. तर हे ठरवते कोण आणि कसे? तर आपण खातो. payment करतो तेव्हा बिल generate होते. अशी लाखो बिल्स मिळून database तयार होतो. या बिल मध्ये साधारण पॅटर्न कळून येतो की कुठले दोन पदार्थ एकत्र खायला लोकांना आवडतात. त्याप्रमाणे हे rules वापरून मेनू ठरवले जातात. 

तर ही नुसती झलक. ते बिल तयार करतात. ते cctv वापरतात. त्या सायबर च्या विळख्यातून तयार होत असतो तो database. आणि त्याचा अभ्यास करून बनते तुमच्या आमच्या जगण्याची एक चालती बोलती कुंडली. ती म्हणजे mining.

 घाबरायला नको. पण सावध राहायला हवे. अभ्यास करत राहायला हवे. मागच्या ब्लॉग मध्ये एक प्रश्न विचारला होता ना. की तुम्ही मैत्रिणीशी चॅट वर बोलत आहात की मला अम्ब्रेला पॅटर्न चा ड्रेस घ्यायचा आहे. आणि नेमका तुम्हाला शॉपिंग साईट्स वर अगदी तुम्हाला हवा तसाच ड्रेस पहिल्या नंबर वर दिसतो. या काही निव्वळ योगायोग नसतो बरं. तो जुळवून आणलेला योगायोग असतो. 

तर शेवटाकडे येताना शारदीय नवरात्राच्या पहिल्या माळेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. उद्या दुसऱ्या माळेला येतो नवीन उदाहरणे घेऊन. पुढच्या नऊ दिवसात काय वाचायला आवडेल ते सांगा. आणि आता जाता गम्मत म्हणून कंमेंट्स मध्ये सांगून जा की या ब्लॉग मधून वाचक म्हणून तुम्ही आणि ब्लॉगर म्हणून आम्ही काय data mining केले असेल बरं?? आणि शेवटचे एक. या ब्लॉग ला लगेच adsense नी ऍड लागली. automatic. आणि ती पण data mining शीच संबंधित. आता बोला!!!!!

खाली दिलेल्या लिंक वर या विषयातील सर्व लेख एकत्रित वाचू शकता. 

तुमचेच रहाट - गाडगे माझ्या लेखणीतून..: Cyber च्या विळख्यात (avanigokhale.blogspot.com)

-- अवनी गोखले टेकाळे

1 comment: