आपण लिहिलेलं कोणी वाचत का खरंच? असा प्रश्न पडतो कधी कधी. पण त्याचे उत्तर तेव्हा आपोआप मिळून जाते जेव्हा आपल्या लिखाणात खंड पडतो आणि वाचकांचे मेसेज यायला लागतात की अशात काही वाचायला नाही मिळाले.
तर अशात लिहिले का नाही? फार काही गंभीर नाही हो, माझ्या मोबाइल मधला मराठी language keyboard delete झाला होता गार्गी कडून. एकतर वेळ मिळत नाहीये सध्या. त्यात लिहावे वाटले की मग हा technical problem. आणि काही काही बाबतीत मी फार आळशी आहे त्यातली ही एक. त्यामुळे app download करेकरेपर्यंत आज उजाडला.
दुसरा आणि महत्वाचा मुद्दा हा की काहीतरी चांगले वेगळे विषय डोक्यात येईपर्यंत हा वेळ घेत होते कदाचित. आणि आज तो मुद्दा मिळाला. artificial intelligence, neural networks, image processing असे काही विषय म्हणाले तर technical पण म्हणले तर आपल्या प्रत्येकाच्या digital life चा नकळत भाग झालेले. अशा काही गोष्टी सरळ साध्या सोप्या भाषेत जर तुमच्यासमोर मांडता आल्या, तर तुम्हाला पण वाचायला आवडेल.
आज तुम्ही, मी आपण सगळेच सोशल मीडिया वर active असतो. पण सोशल मीडिया आपल्याकडून काही मिळवत असेल का? आपण google करतो, माहिती मिळवतो. मग तशीच माहिती आपली कोणी मिळवत असेल का? आपल्या नकळत? आजच्या जगात मोफत असे काहीच नसते, अगदी श्वास सुद्धा. मग आपण जे प्लॅटफॉर्म वापरतो, ते कसे मोफत मिळतील? ते आपल्याकडून वसूल करत असतात. काय?? तर आपला डेटा. आपली एक चालती बोलती ऑनलाईन कुंडली. आपण कुठल्या series बघतो, आपण काय खरेदी करतो, आपण कोणाशी काय बोलतो, कुठल्या प्रकारच्या फोटो/पोस्ट ला कुठल्या प्रकारे react होतो, आपण साधारण किती कसे काय पैसे खर्च करतो, काय खातो, आपण कुठे फिरतो. याचा उपयोग कोणाला होतो? आपल्या मनात एखाद्या पॅटर्न चा टॉप खरेदी करावा असे असेल आणि सहज म्हणून एखाद्या मैत्रिणीला चॅट वर तसे वर्णन सांगितले तर तसेच टॉप वेगवेगळ्या shopping site वर दिसायला लागतात. एकदा फेसबुक च्या आपल्याच profile data वर नजर टाकली तर याहून बरीच technical माहिती सेव्ह झालेली दिसेल. जसे की प्रत्येक session चे ip address, browser details, mobile details, location address, आणि बरेच काही.
यासारख्या बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी, छोटे छोटे algorithms वेगवेगळ्या लेखांमधून, उदाहरणांमधून समजावून द्यायचा प्रयत्न करणार आहोत. थोडक्यात म्हणजे "IT हे Profession आणि लिखाण ही hobby" एकत्रित करून तुमच्यासमोर येणार आहोत. आहोत, आहोत म्हणजे आम्ही कोण? तर या IT Profession मध्ये काम करणारे आणि मराठी ची आवड असणारे आणि त्यासाठी सवड काढणारे आमचे हौशी मित्रमंडळ. वेळेचा अभाव आणि कामाचा आवाका जास्त. त्यात पण नसत्या उठाठेवी भरपूर. त्यामुळे सातत्य राहील असा विश्वास नाही देता येणार. पण जेव्हा जेव्हा लिहू तेव्हा तेव्हा अभ्यास करूनच लिहू त्यामुळे तुम्हाला वाचायला आवडेल ही खात्री नक्की देतो.
तर आता परत एकदा कळीचा मुद्दा. Cyber च्या विळख्यात मधल्या पहिल्या लेखाचे पहिले वाक्य. आपण लिहिलेलं कोणी वाचत का खरंच? आता उत्तर मिळालं असेल. नेट ऑन केल्यावर काहीच private नसतं. आपल्याला प्रत्येक क्षणाला कोणीतरी "वाचत" असतं!!!
या विषयावरील लेख खालील लिंक वर एकत्रित वाचू शकतो.
तुमचेच रहाट - गाडगे माझ्या लेखणीतून..: Cyber च्या विळख्यात (avanigokhale.blogspot.com)
-- अवनी गोखले टेकाळे
Nice start...eagerly waiting to read on it.
ReplyDelete