Daughter's school, आमची शाळा या नावावरून थोडे लक्षात आलेच असेल. आई बाप मराठी मिडीयम मध्ये शिकलेले आणि लेकराला इंग्लिश मिडीयम मध्ये घातलेले. आमच्या सारख्या पालकांची उडणारी हलकी फुलकी धमाल या लेखमालेतून लिहायचा विचार आहे.
धमाल सुरूवात करण्या पूर्वी थोडेसे. आम्ही पण मराठी मिडीयम मध्ये शिकलो. काय बिघडले? काहीच नाही. कुठेच मराठी मध्ये शालेय शिक्षण झाल्याचा न्यूनगंड आला नाही. बुध्दी प्रमाणे, आर्थिक परिस्थिती प्रमाणे जमेल तसे शिकत राहिलो आणि पुढे जात राहिलो. त्या जोरावर मिळालेल्या नोकरीच्या ठिकाणी देखील काहीच अडले नाही. कामाच्या गरजे प्रमाणे शिकत पुढे जात राहिलो. ऑफिस मध्ये इंग्लिश आणि घरात मराठी भाषा बोलणारे आम्ही. वाचन आणि लिखाणाची करायची प्रचंड आवड. अजूनही मराठी वाचायला आणि लिहायला आवडते. कारण एकच. मराठी घरचे वाटते आणि इंग्लिश वाचताना ऑफिस मध्ये वावरल्याचा फील येतो. तर असे मराठी वर प्रेम असणारे, मराठी शाळेत शिक्षण झालेले "आम्ही".
मराठी दिनाच्या दिवशी Blogger ग्रुप वर शुभेच्छा देताना काही लोकांचा एक सूर ऐकू आला. तो म्हणजे यांच्या मराठी च्या शुभेच्छा फक्त कागदावर. यांची मुले इंग्लिश शाळेत. आणि तेव्हा पासून नाण्याची दुसरी बाजू मांडावी कागदावर असे वाटत होते.
हळू हळू स्थिरता येणारे आम्ही, जेव्हा पाल्याच्या शाळेची एडमिशन घ्यायची वेळ आली तेव्हा कुठलेही दुमत न होता, कुठलीही चर्चा न होता इंग्लिश मिडीयम शाळेत एडमिशन घेऊन आलो होतो. कारण काय? मराठी बोलायची लाज वाटते म्हणून नाही आम्ही इंग्लिश बोलत. तर आमची ती गरज आहे. तसेच मुलीला इंग्लिश शाळेत घालणे ही देखील. ऍडमिशन घेतल्या पासून पुढच्या एक तपा मध्ये आम्ही महाराष्ट्र सोडणार नाही याची खात्री आम्हाला नाही म्हणून. आमच्या नोकरी चे स्वरूप आम्हाला ती स्थिरता देत नाही म्हणून. यदा कदाचित जर कंपनी ने सांगितले तुम्हाला उद्या पासून बंगलोर हेड ऑफिस वरून काम करायला लागेल तर फक्त मराठी साठी त्यांना नाही म्हणायची धमक आमच्या मध्ये नाही म्हणून. जर कंपनी ने on-site पाठवले तर फक्त भाषेवर प्रेम असल्याने आम्ही संधी नाकारतो हे म्हणण्या पेक्षा, मराठी माणूस तिथे जाऊन आपली छाप उमटवायची तयारी ठेवतो. आणि या सगळ्या गुंत्यात असे वाटते की आपण जर मुलाला मराठी शाळेत घातले आणि उद्या उठून आपल्या नोकरी मुळे त्याला अमेरिकेत न्यायची वेळ आली तर आपल्या मराठी शाळेच्या अट्टाहासाने त्याची कुतर ओढ नको व्हायला.
असो. तर थोडेसे गंभीर वळण आले पहिल्याच लेखाला. पण आता एडमिशन घेऊन तर झाली ना. आता यापुढे हे काही विचार करत नाही बसायचे आणि आता आपल्या निर्णयावर मागे वळून नाही पाहायचे. आता फक्त त्यातून उडणारी धमाल अनुभवायची. या सगळ्यात मुलांना मराठी ची गोडी निर्माण होईल का? पालकांना इंग्लिश मधून शाळेचा अभ्यास घेता येईल ना? या पुढच्या लेखांमध्ये काही धमाल किस्से घेऊन येत आहे. तुमचे, माझे, त्याचे, तिचे आपल्या सगळ्यांचे. Daughter's school, आमची शाळा या लेखमालेतून. तुमच्या कडे काही धमाल किस्से असतील तर कमेंट्स मधून कळवत रहा.
-- अवनी गोखले टेकाळे
या लेखमालेतील लेख तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरती एकत्रित पणे वाचू शकता.
Of similar opinions we also have. Love for Marathi will be always there but need is different. On the top of it we were not in Maharashtra so no option left for us...still faced this questions few times...we replied please give us Marathi school details out of Maharashtra...we will enroll.
ReplyDeletefact ahe. tu tar khup lihu shakate ya vishayavar.
Deleteवाघिणीचे दूध पचवनारी मराठी लेकरं आहोत आपण.
ReplyDelete४ वर्षाचा सौरिष मराठी, हिंदी, इंग्लिश आणि घरकाम करणाऱ्या ताईच्या कृपेने अरबी आणि तेलगू पण बोलतो आता.
भाषा हे व्यक्त होण्याचं, संवाद साधण्याच माध्यम आहे. मातृभाषेवर प्रेम नक्कीच असावं, खरं तर गर्व सुद्धा असावा पण त्यामुळे इतर भाषांचा तिरस्कार करणे योग्य नाही. ही शिकवण मला मातृभाषेनेच आणि आता माझ्या मुलाने मला दिली
agadi kharay. tumche ajun pan anubhav share kara ya vishayanvar. sanu ani saurish che alele..
Delete