Saturday, April 3, 2021

संसार

स्मिता काकूंच्या संसारातील काही आठवणी त्यांच्याच शब्दात

-------------

किशोर अवस्था सरली, तारुण्यात आले
गोविंद रावांसारखे पती मला लाभले
स्वप्नाळू मन असते तारुण्यात
तशातच होत असते संसाराला सुरुवात
संसाराच्या सुरुवातीला राखायचा असतो सर्वांचा मान
त्यागातच मिळत असतं मोठ स्थान
स्थानाच महत्त्व पाळत पाळत संसाराची वेल फुलली
पुत्राला जन्म देऊन स्मिता संसारात रमली
पती झाले बाबा, सासू सासरे झाले आजोबा आजी
संसाराची वेल फुलली पण घरची जबाबदारी वाढली
बाळाचं संगोपन, मोठ्यांची सेवा, 
पतीला हवा रोज गोड गोड मेवा
पण स्वतः साठी वेळ काढू केव्हा?
स्वतः तलं मी पण केव्हाच विरल
घरातलं करण्यातच सगळ काही विसरल

एक घटना अशी घडली
अंगातील सुप्त गुणांची सारे उघडली
खूप केली धडपड, मिळाली सर्वांची साथ
जीवनात झाली सुखाची सुरुवात
पैशातच असतो मान आणि प्रतिष्ठा
म्हणूनच सुरुवातीला झाले हाल आणि अपेष्टा
ज्ञान येथे मान, धन तेथे स्थान
माझ्या आयुष्यातला हा काळ महान
महान पण मिळवण्यात बाळ कसा झाला मोठा
ध्यानात नाही आले, जीवनात आला तोटा
नाही केले लाड, नाही केली हौस
तीन चाकी सायकल नाही म्हणून
बाळाच्या डोळ्यात पाण्याचा पाऊस
समजदार व गुणी बाळ नाही केला कधी हट्ट
बाळाकडे पाहून कधी कधी मनातच होत खट्ट

आता मात्र तसे नाही, पाठीशी आहे रामाई
माझ्या संसाराला आहे अम्मा अण्णांची पुण्याई
पुण्याईला ओंजळीत घेऊन मागते ग रामाई
एक सुंदर सालस अशी,
दे मला सूनबाई, दे मला सूनबाई.

-- सौ. स्मिता टेकाळे (प्रतिभा राऊतमारे)

No comments:

Post a Comment