–-------------
एकदा शाळेत आई वरची कविता शिकवत असताना फार गलबलून आल. जुन्या आठवणींच काहूर मनात माजलं आणि आठवणीतून, साठवणीतून जे जे मनात आल ते ते कागदावर उतरवत गेले. स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी म्हणतात तशीच काहीशी अवस्था झालेली
बालपण कसं गेलं, स्मरणात नाही
आईचं रूप लक्षात नाही
शिक्षणामुळे दूर केलं आईला
दुसऱ्याकडून संस्कार होणं आलं नशिबाला
शालेय शिक्षण झालं आत्याच्या घरी
दडपणाखाली जगत स्वतः लाच सावरी
शेजीचा हात अन् आईचा हात
असेच म्हणत मी दहावी झाले पास
आता तरी मिळेल आई चा आधार
म्हणून धडपडले तरी झाले निराधार
स्वप्नाळू वय आलं, हसत मुरडत
मनाचं फुलपाखरू होतं, हिंडत फिरत
बंधनाचं रिंगण घातलं मनाभोवती
शिक्षणाची तलवार होती डोक्यावरती
खूप खूप शिकायचं ठरवलं होतं
चंद्रपूर च कॉलेज गाठायचं होतं
कशाच काय डोक्यातच राहिलं
उदगीर च कॉलेज बळचच गाठलं
काम आणि ज्ञान कसा बसायचा मेळ
दोन्ही करताना होई जीवाची घालमेल
आपल्या नशिबाला कष्टच फार
दडपून रहाण्यातच मन झालं ठार
मेलेल्या मनानं जगतच राहायचं
आईच्या आठवणीनं मन भरून यायचं
आईने सोडली शेवटची साथ
कॅन्सर न धरला तिचा हात
तेव्हापासून मी पूर्णच कोलमडले
नेहमी साठीच दुसऱ्याच्या दारात पडले
संपली सारी विश्वातील छाया
कोण करील माया?
माझ्या देवराया
माझ्या देवराया
-- स्मिता टेकाळे (प्रतिभा राऊतमारे)
No comments:
Post a Comment