गेले काही दिवस मोबाईल आणि डायरी पेन याला सक्तीची विश्रांती दिलेली.. वार्षिक परीक्षा होती ना..पाच सात पक्वान्ने, पुरणावरणाचा स्वयंपाक.. आणि बरेच काही.. परीक्षा पास झाल्यावर वर्षभर पुरेल एवढे समाधान आणि कॉन्फिडन्स घेऊन परत आले.. टाईम प्लीज सोडून.. मैफिलीत नवीन विषय घेऊन.. "ऋतू हिरवा"
आपल्याकडे ऋतू सहा.. शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत.. प्रत्येक ऋतू ची तऱ्हा वेगळी.. निसर्गाची उधळण वेगळी.. मनाची स्थित्यंतरे वेगळी.. खाण्यापिण्याची रेलचेल आणि ऋतू नुसार खाण्याच्या होणाऱ्या इच्छा वेगळ्या.. सणवार वेगळे.. निसर्गाला धरून त्या त्या हवामानानुसार नैवेद्य वेगळे.. प्रत्येक ऋतू ची नवलाई वेगळी त्या अर्थाने प्रत्येकच ऋतू हिरवा.. हाच विषय घेऊन येत आहे.. सहा ऋतू आणि त्याच्या भोवती गुंफलेले आपण सगळे.. अजून काय लिहू.. पुढच्या लेखात काहीतरी लिहायला ठेवते की.. सुरुवात करतेय पुढच्या लेख मालेची.. "ऋतू हिरवा"..
तुम्ही पण आहातच की सोबत.. मनाला परत एकदा थोडेसे मराठी महिने आणि मराठी ऋतू यांच्या सोबत जोडूया.. व्यक्त व्हा.. तुमचे ऋतूंचे अनुभव, तुमच्या नजरेतून आमच्यासोबत उलगडायला सज्ज व्हा.. लिहिते व्हा.. छान छान वाचायला देत रहा..
-- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment