Wednesday, August 5, 2020

Start blogging

आज परत तोच मुद्दा घेऊन येत आहे की तुमचे लिखाण जतन करून ठेवा. आपण वेगवेगळ्या साईट वर लिहितो, फेसबुक वर लिहितो पण ते सगळे तुमच्याकडे सेव्ह केलेले आहे का? चांगले लिहितो ना? मग ते जपून ठेवणे पण तेवढेच आवश्यक आहे. 

मी कॉलेज पासून लिहायला सुरुवात केलेली. पण तेव्हा कॉलेज च्या नोटबुक मध्ये मागच्या पानावर लिहिलेल्या कविता त्या त्या वर्षाच्या रद्दीच्या गठ्ठ्यात पसार झाल्या. मग कॉलेज च्या शेवट शेवट शहाणपण आलं आणि ब्लॉग लिहायला सुरुवात केली. जतन करायला सुरुवात केली. 

आधी लोक डायरी लिहायचे. त्याचेच हे नवीन रूप समजा. खूप वेगवेगळे पर्याय आहेत. त्यातला हा एक. तुमची स्वतःची  ब्लॉग साईट असावी असे नाही वाटत का तुम्हाला? दोन तीन बटणे दाबून जर ते काम होत असेल तर मग का नाही केले अजून पर्यंत असे एकदा स्वतः ला विचारा. जर वेळात वेळ काढून लिहू शकतो तर वेळात वेळ काढून ते जतन का नाही करत हे पण एकदा स्वतःला विचार. आणि मग स्वतः चा ब्लॉग लिहायला सुरवात करा.

खाली दिलेले पहिले गमभन चे धडे गिरवा. एक नवीन वाट तुमची वाट पाहत आहे. लिहायचे ते स्वतः च्या ब्लॉग वर. कारण आपलं तर ठरलंय, माज करायचा तो स्वतः च्या हिमतीवर. 

१. आपण सगळे फेसबुक वरती बोलतो म्हणजे तुमचा gmail चा account आहे का? असे काही विचारायला नको. तो असेलच असे समजून पुढे जाऊ.
२. gmail च्या अकाऊंट ने blogger.com वरती जाऊन login करा.
३. setting मध्ये जा. एक छानसे title आणि description लिहा. description म्हणजे फार अवघड नाही एक छोटासा सारांश, साधारण तुमच्या ब्लॉग मध्ये लोकांना काय वाचायला मिळेल त्याची थोडक्यात उजळणी. blog address - इथे एक छान छोटे नाव द्या. जे तुमच्या ब्लॉग चे url name असेल, तुमच्या ब्लॉग ची ओळख असेल. म्हणजे माझे ब्लॉग चे नाव आहे - avanigokhale.blogspot.com तर त्यातला avanigokhale हा आहे ब्लॉग चा address 
३. new post वरती click करा. भाषा select करा मराठी. पाहिजे ते लिहा आणि पब्लिश करा. 
४. पोस्टची url copy करा आणि तुमच्या मित्रांसोबत, फेसबुक वर सगळीकडे share करा.. 

इतके आणि इतकेच आहे. सोपे आणि सहज. मग थोडे दिवस गेले की डावीकडे काय काय बटणं दिसतात बुआ असे आपापले शोधाशोध सुरु करा. मग नवीन घराला decorate केल्यासारखे हळूहळू सजावट करत राहा. layout आणि theme मध्ये खूप काय काय सापडेल.  तुमच्या पेज ला तुम्ही रंगीत करू शकता. विषयवार वर्गीकरण करू शकता. आपापले खेळत रहा त्या पेज वर. शोधा म्हणजे सापडेल. 

अजून सोपे सांगू.. play store मध्ये ब्लॉगर नावाचे app आहे.. download करा.. आणि डायरी लिहिल्यासारखे सुरु करा.

मनातला बागुलबुवा काढून टाका.. आणि आजच लिहा तुमचा पहिला ब्लॉग. लिहिलात की नक्की सांगा. नवीन लिहाल ते स्वतःच्या ब्लॉग वरच लिहा. जुन्याचे हळूहळू संकलन तिथे करत जा. तसे पर्याय खूप आहेत पण google वर आपला भरवसा जरा जास्त.. म्हणून हे सुचवले.. मग करताय ना श्री गणेशा..!! 

तुमच्या छोट्या मोठ्या शंका विचारत रहा. निवारण करण्याचा नक्की प्रयत्न करीन. आणि माझ्या ब्लॉगपेज च्या उजव्या बाजूला लेबल दिसतील त्यात "technical help" मध्ये गेलात तर अशाप्रकारचे मदत होणारे ब्लॉग एकत्रित केलेले दिसतील. तेही वाचत रहा. 

Technical help
https://avanigokhale.blogspot.com/search/label/technical%20help?m=1

-- अवनी गोखले टेकाळे 

4 comments:

  1. मुंगी असो वा मेरू। जगण्यासाठी दिधला आधारू॥ ज्ञानेशांची ओवी गुरू कोण कोण असू शकतो, त्याचे वर्णन करते..किती सुंदर आणि सोप्या शब्दात ब्लाॅग विषयी माहिती सांगितली आहे..गभमन पाटीवर गिरविताना आईने बाळाचा हात हाती धरून ती अक्षरे गिरवावी..तसा आपण धडा गिरविला..याच कारणाने अवनी ताईला गुरू म्हणून स्वीकार करावा..!
    खूप खूप आभार..✍🌹

    ReplyDelete
    Replies
    1. khup mothi protsahan denari comment. thank you.

      Delete
  2. खुप उपयूक्त...आणि मुद्देसूद माहिती...धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. thank you g. evdhe kar mag pudhache sangate :)

      Delete