Thursday, August 6, 2020

जगात भारी..

कधी कधी वाटत आपण पण व्हावं की थोडं स्वार्थी.. आपलं आपण लिहावं गुपचूप लपून छपून.. कोणाला न सांगता स्पर्धात वगैरे इकडे तिकडे सबमिट करावं.. आपले आपण छंद जोपासावेत आणि आपल्यापुरतं ठेवावं की थोडंसं.. कशाला सगळ्यांच्या मागे लागावं.. तुम्ही पण द्या हो स्वतःला वेळ, तुम्ही पण लिहा हो ब्लॉग, काढा स्वतःचे पेज, तुम्ही पण काढा youtube channel.. परत वाटायचं स्वतःचाच उदोउदो करते, माज करते.. त्यात असं पण वाटत कधी कधी नुसते वाचून सोडून देणारे खूप असतात.. न वाचता सोडून देणारे पण खूप असतात,, आपला वेळ काय वर आला आहे का? बघतील त्यांचं ते.. वाटलं तर शोधतील स्वतःहून, करतील.. नाहीतर देतील सोडून.. कशाला नसत्या फंदात पडावं.. खरं सांगू का एकदम मनातलं.. मी नवीन लिहायला लागले तेव्हा खूप धडपडले.. खूप वेळ इकडे तिकडे माहिती शोधत बसले.. काय करू? कसे करू? एक वाक्य मराठी लिहायला मला एक तास गेला होता.. तीन वाक्यांचा एक मेसेज मी दोन तास खर्ची घालून लिहिला होता.. पण आता एक ब्लॉग लिहायचे मनात आणल्यापासून पंधराव्या मिनिटाला पूर्ण होतो आणि शेअर झालेला असतो.. हे सगळे technology मुळे शक्य झाले.. मग त्या technology ची आपण बाकीच्या सह लेखकांना का ओळख करून देऊ नये.. वेळात वेळ काढून आपण आपली हॉबी सांभाळतो तर थोडा वेळ सगळ्यांचा का वाचवू नये.. मी खरंच सांगते हो, यात घंटा काही स्वार्थ नाही.. आहे ते एवढे आणि एवढेच.. तर काल ब्लॉग तयार करण्याबद्दल लिहिले आणि चोवीस तासाच्या आत आपल्या मैफिलीतल्या चार मैत्रिणींनी मनावर घेऊन स्वतःचे ब्लॉगपेज सुरु केले.. आणि आता खरंच असं वाटत आहे.. असा वेडेपणा करावा.. आणि सारखा सारखा करावा.. ज्याला जे वाटायचे ते वाटू दे.. आहे हे असं आहे.. करते माज तर करते.. असा माज परत परत करावा.. तर… आपल्या चारही मैत्रिणींच्या ब्लॉग पेज ची लिंक देत आहे खाली - कविता सुरसे - https://kavitasurase.blogspot.com नेहा खेडकर - https://nehakhedkar1.blogspot.com ऋतुजा वैरागडकर - https://rutujavairagadkar.blogspot.com सुवर्णा बागूल - https://suvarnablogs.blogspot.com बाकीचे लोक हो.. आपका नंबर कब आयेगा.. विचार करूच नका आता.. करून टाका पटापट एक ब्लॉग साईट तयार.. स्वतःच्या नावाची.. स्वतःच्या हिमतीवर माज करूया.. काही अडचण आली तर बिनधास्त विचारा.. -- अखिल भारतीय जगात भारी वाटत आहे हो, संघटनेची अध्यक्षा - अवनी गोखले टेकाळे

No comments:

Post a Comment