आत्ताच आपल्या सुनील चालवडे सरांनी पण ब्लॉगपेज सुरु केले स्वतःचे.. त्याबद्दल अभिनंदन.. सर ब्लॉग लिंक शेअर करा आमच्या सोबत..
आता नवीन नवीन ब्लॉग लिहिणार्यांना पुढच्या शंका यायला लागल्या आहेत.. ब्लॉग लिहिला.. पब्लिश केला.. आता पुढे काय? तो लोकांना वाचायला कसा द्यायचा?
१. तुमची होमपेज लिंक क्लिक केली की ओळीत तुमचे सगळे ब्लॉग एका खाली एक दिसतात..
२. तुम्ही रोजच्या रोज जो ब्लॉग लिहाल त्याची लिंक सगळ्यांसोबत शेअर करू शकता.. असेच करा.. लोक स्वतःहून तुमची होमपेज लिंक कशाला रोज बघत बसतील..
३. ब्लॉगर वर अकाऊंट असलेले, नसलेले सगळे तुम्हाला रिप्लाय देऊ शकतात.. पण बहुतेक वेळा आपण लिंक जर व्हाट्स अँप किंवा फेसबुक वर दिली तर तिथेच अभिप्राय येतात.. हे आपले स्वानुभवाचे बोल..
४. ब्लॉगर च्या अँप वरून कशी लिंक शेअर कराल? - अँप मध्ये जा.. वरती तुम्हाला दोन भाग दिसतील.. एक published आणि दुसरे drafts.. आता draft कुठे शेअर करते का कोणी.. त्यामुळे आपले published मध्येच जा.. तिथे ओळीने सगळे ब्लॉग दिसतील.. प्रत्येक ब्लॉग च्या उजव्या कोपऱ्यात शेअर चे दोन रेषा आणि दोन गोळे वाले चिन्ह दिसेल.. दिसले का? मग जो ब्लॉग शेअर करायचा तिथे क्लिक करा.. आणि मग तुम्हाला व्हाट्स अँप, फेसबुक, messenger सगळे option दिसतील.. तिथे पाठवा.. म्हणजे तो ब्लॉग पाहिजे तिथे जाईल..
५. लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वरून कसे पाठवाल? - ब्लॉगपोस्ट ओपन करा.. आणि वरती address bar मध्ये तुम्हाला जी url दिसते ती जशी च्या तशी कॉपी करा.. आणि पाहिजे तिथे पेस्ट करा..
अजून एक आयडिया सांगू का.. जी मी करते.. ब्लॉगर च्या अँप वर जाऊन ती पोस्ट स्वतःच्या व्हाट्स अँप स्टेटस ला शेअर करायची.. आणि स्टेटस मध्ये जाऊन ती लिंक कॉपी करायची आणि पाहिजे तिथे पेस्ट करत जायची.. सोपे पडते.. त्यातून नाहीच जमले तर messenger आहेच.. मला पिंग करा आणि विचारा.. (कामाचे विचारलेत तर मदत मिळेल पण पांचट पिंग केले तर नाक fracture होईल एवढा मोठ्ठा ठोसा मिळेल.. आपण आधीच सांगून टाकत असतो.. आहे हे असे आहे..)
आता हा खटाटोप का करायचा?
१. साहित्य चोरी टाळण्यासाठी. खरंच ज्यांना तुमचे लिखाण वाचायचे आहे तेवढेच लिंक ओपन करून वाचतात.. उचलेगिरी करून, भुरट्या चोऱ्या करून, आपल्या लेखाच्या किंवा कवितेच्या खालचे आपले नाव उडवून स्वतःच्या नावावर पोस्ट करणारे साहित्यचोर फारच busy असतात बाप्पा.. त्यांना जास्त वेळ नसतो आपल्या लिंक उघडून वाचायला.. म्हणजे चोरी पूर्ण बंद नाहीच होत एवढे करून.. पण त्यातल्या त्यात प्रमाण कमी होते.. आणि आपल्याकडे प्रूफ राहते की आपण कुठल्या तारखेला पब्लिश केले आहे आपल्या ब्लॉग वर..
२. तुमचे लिखाण एकत्रित तुमच्याजवळ कायम स्वरूपी राहावे म्हणून
३. तुम्हाला काही वर्षांपूर्वी लिहिलेले एखादे लिखाण आज आत्ता कोणालाही पटकन पाठवता यावे, search करता यावे, विषयवार वर्गीकरण करता यावे म्हणून
४. थोडासा स्वतःच्या नावाची वेबसाईट असल्याचा माज करता यावा म्हणून
५. यातले काहीच नसेल पटत तर रात्री एक वाजता तुमच्यासाठी ही पोस्ट लिहीत बसलेल्या मला काहीतरी माझ्या कष्टाचे समाधान मिळावे म्हणून तरी करा हो.. अजून काय सांगू.. बघा जमतंय का?
-- अवनी गोखले टेकाळे
ताजा कलम - पाच सहा लोकांनी दणादण ब्लॉग लिहायला सुरवात केली कालपासून.. त्यामुळे शंका खूप येणारेत.. जमेल तसे सांगत राहीन.. जानने के लिये पढते राहिये.. धारावाहिक ब्लॉग की दुनिया..
No comments:
Post a Comment