Wednesday, July 29, 2020

Create your own - YouTube Channel

नमस्कार मंडळी,

कालची चर्चा चांगली झाली.. मराठी लिहिणे सोपे जावे यासाठी आपण काय करू शकतो यासाठी सगळ्यांनी चांगले पर्याय सांगितले. आता थोडेसे youtube channel बद्दल. YouTube म्हणजे काय? असे विचारणारे कोणीच नसेल आपल्यापैकी.. सगळ्यांनी एखादा तरी व्हिडिओ पहिला असेलच की.. त्यामुळे सरळ चॅनेल कडेच वळूया.. आपला स्वतःचा व्हिडिओ बनवून youtube वर टाकावा असे वाटते का तुम्हाला. 

साहित्य चोर जेव्हा आपल्या कविता किंवा लेख चोरतात आणि youtube वर पोस्ट करतात ते सुद्धा लेखकाच्या नावाचा उल्लेख न होता तेव्हा तुम्हाला वाटत नाही का की असे होण्यापेक्षा आपणच आपल्या वाचकांपर्यंत पोचावे.. त्यासाठी हा खटाटोप. मला काही फार माहित आहे असे नाही.. पण तरी जेवढे माहित आहे ते तुम्हाला सांगावे यासाठी काही मुद्दे खाली लिहीत आहे..  

१. तुमचे gmail अकाऊंट आहे म्हणजे तुम्ही तोच e-mail id youtube, blogger सगळीकडे वापरू शकता.(ब्लॉगर बद्दल पुढच्या वेळी) परत नवीन अकाऊंट काढायची गरज नाही. 
२. youtube अकाऊंट आहे म्हणजे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहू शकता. पण तुम्हाला जर स्वतः चा व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर मात्र स्वतः चा चॅनेल काढणे आवश्यक आहे. 
३. तुमच्या youtube अकाऊंट वरून एखादा व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करा. तो होणार नाही आणि तुम्हाला विचारतील "do you have your own channel किंवा create your own youtube channel" बास इतकेच! हो म्हणा आणि करा create तुमचा चॅनेल. त्याला एखादे नाव द्या..आणि करा श्रीगणेशा.
४. बाकी मग youtube studio मध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळत राहील.. किती view मिळाले, कधी मिळाले, तुमचे subscriber किती, वगैरे 
५. तळ्याकाठी उभे राहून पाण्यात बघितले तर पोहता येत नाही.. एकदा उडी मारा मग आपोआप पोहायला शिकाल. बाकी youtube help खूप चांगली आहे. मनातले सगळे प्रश्न तिथे विचारा आणि उत्तरे मिळावा.. 

इतके आणि इतकेच असते. काही अवघड नाही. एखादा साहित्य चोर जर आपले लेख आणि कविता चोरून पोस्ट करून मोठा होऊ शकतो तर स्व बळावर आपण का नाही? फक्त एकच आहे.. चांगले लिखाण करूया, चांगला व्हिडिओ बनवूया.. बस इतकाच विचार करूया.. स्वतःचा आनंद इतकंच काय ते..बाकी मला तर वाटत views, likes, comments हे सगळे by-product आहेत.. आपण आपले original product चांगले तयार करण्याकडे लक्ष केंद्रित करूया.. 

करा मग श्री गणेशा.. आपल्यापैकी काही सिनियर लोक आहेत इथे जे अजून चांगले मार्गदर्शन करतील.. सध्या इतकेच.. आणि हो माझ्या youtube channel ची पण लिंक देत आहे.. बघा.. आणि like, share, subscribe करायला विसरू नका. 


-- अवनी गोखले टेकाळे 

No comments:

Post a Comment