वैशाली नावाच्या आमच्या दोन चुलत जावा.. मोठी वैशाली आणि छोटी वैशाली..दोघी सध्या PPE kit घालून वावरत आहेत.. मोठ्या वैशाली बद्दल लिहिलेले आधी, आज छोट्या वैशाली बद्दल..
आयुष्यात कधी वाटले असेल का बरं वैशू तुला, की तुला कधी PPE किट अंगात घालून रोज दिवसभर तणावाच्या वातावरणात नोकरी साठी घराबाहेर पडावे लागेल.. जीवन मृत्यू चा खेळ मनावर दगड ठेवत उघड्या डोळ्यांनी बघावा लागेल.. म्हणजे डॉक्टर लोकांचे कौतुक थोरच पण त्यांची कशी कॉलेज ला ऍडमिशन घेतल्यापासून दवाखान्याच्या वातावरणात काम करायची मनाची तयारी असते.. हळूहळू इंटर्न मग स्वतःची प्रॅक्टिस असे बरेच टप्पे त्यांना थोडे थोडे करत कणखर बनवत असतात.. पण सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली तू.. वेगळ्या वातावरणात, वेगळ्या जगात वाढलेली तू.. कधी तुला आयुष्यात स्वप्नात तरी वाटले होते का ग की तुला अशा परिस्थितीत रोज दवाखान्यात काम करावे लागेल.. रोजच्या दिवसाला मनाला अजून अजून खंबीर बनवावे लागेल..
मराठवाड्यातली ही मुलगी.. नाकासमोर चालणारी.. छक्के पंजे माहित नसलेली.. असेल त्या परिस्थितीशी जुळवून घेत हसतमुख राहणारी.. सरळ साधी.. हळवी भोळी.. दोन्हीकडचे आई बाबांचे पाठबळ असलेली.. मिळून मिसळून राहणारी वैशाली.. आणि तिची ढाल असलेला सचिन..
सचिन च्या नोकरी निमित्त त्याच्यासोबत छोट्या सानू ला घेऊन परक्या देशात जाते काय.. तिथल्या वातावरणात स्वतः ला जुळवून घेते काय.. घराला सांभाळत नोकरीसाठी बाहेर पडायचे ठरवते काय.. आणि हॉस्पिटल च्या IT डिपार्टमेंट ला जॉईन होते.. पूर्ण डिपार्टमेंट मध्ये एकटी मुलगी तेही कुवेत मध्ये.. जिथे स्त्रियांचा सार्वजनिक वावर कमी.. तिथे तिला जाणीव होते एवढे साधे राहून नाही चालायचे.. निभावून न्यायचे ठरवते.. जगाची रीत शिकते.. आणि हे सगळं चालू असताना सध्याचे हे वातावरण.. रोज तणावाखाली.. काम वाढलेले.. त्यात मॅनेजर सिरिअस ऍडमिट.. सगळी जबाबदारी हिच्या खांद्यावर.. ऑफिस चे आणि घरचे पण.. मावश्या बंद.. सचिन दोन लेकरांची जबाबदारी घेत आहे वैशाली च्या सोबत त्यामुळे आधार मिळत आहे तिला.. नाहीतर आठवड्याची हक्काची नोकरीची सुट्टी पण बंद.. PPE किट पण थकलेले.. मनात भिती सतत.. तरीही हसतमुख..
एवढे होऊन बाहेरचे खावे वाटत नाही सध्या म्हणून मुलाच्या वाढदिवसाला केक कर.. कधी ढोकळा कर.. मध्ये तर टुटी-फ्रुटी आणि पापड केले या पोरीने.. कसा वेळ मिळत असेल असे मी नाही म्हणणार.. वेळ जात नाही का तुझा असेही नाही म्हणणार.. अशा परिस्थितीत उत्साही राहण्यासाठी ती तो वेळ काढते.. वेळात वेळ.. पूर्वीच्या काळी म्हणायचे छंद जोपासणे म्हणजे फावल्या वेळची कामे.. पण या बदलत्या तणावाच्या परिस्थितीत स्वतः ला प्रसन्न ठेवण्यासाठी ती काळाची गरज झाली आहे.. कामात बदल म्हणजे विश्रांती.. तसेच काहीसे असावे.. तिला कळायला लागले आहे आता ते.. तिची पावले आता या सगळ्यातून स्वतः ला वेळ दिला पाहिजे थोडासा असे वाटण्यापर्यंत पुढे गेली आहेत.. आणि परत एवढे करून आज म्हणते मी काहीच करत नाही. मग म्हणलं आता थोडासा बूस्टर डोस द्यायला लागतोय.. म्हणून हा खटाटोप..
गेल्या सात वर्षात आम्ही हिचा आलेख पाहिला आहे.. म्हणजे गणितात ते x = y + c चा आलेख कागदावर काढला की कसा दिसतो हळूहळू पण सतत सतत वर चढत जाणारा.. तो असाच असाच चढता राहो.. वैशू तुला खूप खूप मनापासून all the best.. अशीच प्रगती करत रहा.. आम्हाला संधी देत रहा व्यक्त व्हायची.. अजून काय बोलू.. फार उदास वाटेल तेव्हा तो रेडिओ वाला टी शर्ट घालत जा.. लगेच हसशील.. हसत रहा नेहमी.. लव्ह यू जाऊबाई!!!
-- अवनी गोखले टेकाळे
Nostalgic 😊
ReplyDeleteThank you for everything
Awesome khup chan
ReplyDelete