आज अमर ची विश्वस्त बद्दलची पोस्ट वाचली आणि मन एकदम बारा वर्ष मागे गेले.. एक तप झाले या व्यक्तीशी मैत्री होऊन.. gate चा अभ्यास करायला एकत्र जमायचो त्यातला हा एक.. ते सगळे दिवस आठवले.. अमर, दिपाली, दीप्ती, सुभाष, गणेश, मकरंद सगळ्यांचीच आठवण झाली.. वेड लागल्यासारखा एक महिना अभ्यास केलेला तो आठवला.. चार वाजता चा चहा आठवला आणि ब्रेक मध्ये मारलेल्या गप्पा.. तर या गॅंग नी मला भरभरून दिले पण सध्या फक्त पुस्तक वाचन बद्दल.. तर अशाच चर्चांमध्ये ओळख झाली breadwinner ची..
Breadwinner(लेखक - Deborah Ellis) म्हणजे थोडक्यात रोजीरोटीशी असलेला संघर्ष या पुस्तकात दिसतो. याचे अनुवादित पुस्तक पण आहे.. छोटेसे पुस्तक हातात घ्या आणि वाचून पूर्ण करून ठेऊन द्या.. आणि मग प्रत्येक वेळा जेवताना पानावर बसले की आठवण येते ती "परवाना" ची.. अफगाणिस्तान मधील काबूल मध्ये राहणारी ही अकरा वर्षाची मुलगी जगण्यासाठी पैसे कमवायला बाहेर पडायचे ठरवते.. एका मुलीने बाहेर काम कसे करावे.. भोवतालची परिस्थिती मुलीला काम करू देईना आणि दुसरीकडे भुकेले पोट बसू देईना घरी.. आणि मग ती मुलाचे कपडे घालून रस्त्यावर उतरते.. दीडशे दोनशे पानं फक्त जगण्याचा संघर्ष.. जेवणाची सांगड घालायचा संघर्ष.. या संघर्षात तिची मैत्रीण शौझिया. सगळ्यात काय आवडते माहितेय, त्या दोघींचे एकमेकींना दिलेले प्रॉमिस.. अजून वीस वर्षांनी फ्रांस च्या आयफेल टॉवर खाली भेटू असे एकमेकींना दिलेले प्रॉमिस.. जगण्याची जिद्द आणि त्यावर मात करण्याची तयारी.. वेड्यासारखे झपाटलेल्या दोन मुली आणि तो आयफेल टॉवर. दोन्ही दिसते आपल्या डोळ्यासमोर.. नकळत आपण पण प्रार्थना करतो त्यांच्यासाठी.. सोडवा यांना नरक यातनांतून.. अशक्य असणारे पण तरीही त्यांनी पाहिलेले स्वप्न सत्य होऊ दे..
हे पुस्तक चैन पडू देत नाही की या दोघींचे पुढे काय झाले. कशा जगल्या, कुठे राहिल्या, परत भेटल्या का एकमेकींना.. आणि मग ही उत्तरे शोधायला पुढची दोन पुस्तके नकळत हातात येतात.. "शौझिया" आणि "paravana's journey"
ही तीन पुस्तके तुम्हाला जगण्याचा नवा दृष्टिकोन देतील.. आणि रोजचे जेवण अलगद पानात येते यासाठी, चांगल्या कुटुंबात जन्म झाला यासाठी मनोमन आभार पण व्यक्त कराल..
-- अवनी गोखले टेकाळे
No comments:
Post a Comment