किती ग गजरे,
वेशीबाहेर माळलेले..
वेस दूर गेली तरी,
अजून मन गंधाळलेले..
किती ग पावसाळे,
वेशीबाहेर भिजलेले..
वेस दूर गेली तरी
ओले तन शहारलेले..
मी अवनी गोखले - टेकाळे. मध्यम वर्गीय माणसाचं चाकोरीबद्ध आयुष्य कागदावर उतरवते.. तुमचेच रहाट - गाडगे माझ्या लेखणीतून.. फार काही fantasy नाही.. कोणी खलनायक नाहीत.. नायक किंवा नायिका असतील गोष्टीला तर तेही सरळ धोपट मार्गावरून चालणारे.. रोज आपल्या भोवती भेटणारे.. म्हणून बऱ्याच गोष्टीत विशेष नाम नाही.. फक्त सर्वनाम आहे.. तो ती किंवा ते .. गर्दीतले चेहरे.. तरीही त्यांना काही स्वप्न आहेत.. त्यांनाही आवाज आहे.. तोच आवाज घेऊन आले आहे.. तुमच्यातलीच एक.. तुमचाच आवाज.. अवनी गोखले - टेकाळे
छान
ReplyDelete