Sunday, June 7, 2020

सावळी रजनी

"गंध प्रहराचे" ३ - सावळी रजनी


एका भेटीची, एका प्रीतीची
झालर धरली नभात चांदण्यांची 
सावळी रजनी, शेतातली माची.. 

तरारले रान, जाग काजव्यांची
साथ गंधाळल्या रातराणी ची 
सावळी रजनी, शेतातली माची.. 

खोल श्वासाची, तप्त रुधिराची
धडधडत्या अलवार अधराची 
सावळी रजनी, शेतातली माची..  

-- अवनी गोखले टेकाळे 

1 comment: