एक लेखक दुसरं काय ठेऊ शकतो तारण म्हणून..
माझी प्रतिभा, माझी लेखणी तारण म्हणून ठेवत आहे..
बघा काही जमतंय का?
म्हणाल तर हसवू शकतात माझे शब्द, म्हणाल तर डोळ्यात पाणी देखील आणू शकतात..
बघा काही जमतंय का?
सांगाल तितक्या अलंकारिक रचना, द्याल त्या छंदात जोडून मिळतील..
बघा काही जमतंय का?
नदी, फूल, पाऊस, प्रेम, विरह, संसार इथपासून ते वकील, कर्ज, तारण, वीज, विमा यावरही लिहू शकतो..
बघा काही जमतंय का?
लेखकाची व्यथा ऐण्ड संपत्ती दोन्ही एकच....त्याच लिखाण तेच तो तारण ठेवू शकतो....ज्याला कळले तो खुप छान मोल देतो. मस्तच लिहिली आहे.
ReplyDeletekharay..
Delete