रवितेज झळके पदराला,
हळदी कुंकू मळवटाला,
चंद्रकोर सजली मोरणीला,
सोनसळी साज डोरल्याला,
मोत्याची कुडी कानाला,
गजरा शोभे अंबाड्याला,
चुडा भरला हिरवा हाताला,
त्याने मागे सारले पाटलीला,
कमरेला सजला कसा मेखला,
पायी नाद हलका पैंजणाला,
त्याने दिला मान मासोळीला,
शृंगार साज तुझा हा सजला,
नतमस्तक "अवनी" ही तुजला!!!
No comments:
Post a Comment