Tuesday, April 21, 2020

मन - हायकू


आज मी माझी मन - हायकू सादर करत आहे.. 

मन हसते, 
अलवार दाटते, 
सावर सखे.. 

मन झुलते, 
अविचल राहते, 
सावर सखे.. 

मन हरते,
पाचोळा तेही होते,
सावर सखे.. 

मन चिंतते,
पान भिरभिरते,
सावर सखे..

अवनी गोखले टेकाळे

पुढची कडी जोडण्यासाठी मी स्नेहल ला आमंत्रित करते. 

**********

हायकू या काव्य प्रकाराबद्दल थोडेसे..

हा जपानी काव्यप्रकार आहे.. ज्यामध्ये एक कडवे १७ अक्षरांचे असते.. पहिल्या ओळीत ५ अक्षरे,  दुसऱ्या ओळीत ७ अक्षरे आणि तिसऱ्या ओळीत ५ अक्षरे  असतात.. सध्या एवढंच घुसलंय डोक्यात.. अजून वाचन चालू आहे.. जेवढं समजलं त्याप्रमाणे एक लिहून पहिले आहे.. अजून विद्यार्थी शिकत असल्याने चू. भू. द्या. घ्या.



No comments:

Post a Comment