पहिल्यांदा याची भेट झाली स्कॉलरशिप परीक्षेच्या वेळी.. कॅलेंडर ची गणितं सोडवताना.. २ ऑगस्ट १९४२ ला जर गुरवार असेल तर ५ मार्च १९६० या दिवशी कोणता वार असेल.. असे प्रश्न आले की ते सोडवताना मोजायला लागायचे मध्ये किती लीप इयर आहेत..
मग परत भेट झाली भूगोलाच्या पेपर मध्ये.. पृथ्वी कशी फिरते.. ती कशी २३ अंशात कललेली असते.. मग त्यामुळे पाव दिवस प्रत्येक वर्षी जास्त भरतो.. आणि मग ४ वर्षांनी एक पूर्ण दिवस जास्त येतो..
मग परत याची भेट झाली कॉलेज मध्ये कोडींग assignment करताना.. लीप इयर चा प्रोग्रॅम run करताना..
प्रत्येक वेळी हा दिवस डोक्याची मंडई करून गेला..
No comments:
Post a Comment