इकडे मिळणारी ही सगळ्यात दुर्मिळ गोष्ट.. त्यामुळे जेव्हा ती मिळते तेव्हा जगात भारी असा feel येतो.. एरव्ही चिकट घामट लोंबकळून जाणारे आपण एखाद दिवस तीरासारखे धावत जाऊन window seat पटकावतो तेव्हा स्वतःच अस declare करून टाकायचं कि आपण मुंबईकर झालो..
मग गर्मीमुळे बांधून ठेवलेले केस थोडावेळ सोडून द्यायचे मोकळे वाऱ्याची झुळूक झेलायला.. डोकं खिडकी ला लावायचं .. गजातून पलीकडे लांबवर नजर स्थिरावत मनालाही सोडून द्यायचं मुक्त थोडासा वेळ..
एकमेकात झपाट्याने मिसळलेले रेल्वे रूळ तितक्याच वेगाने आपला मार्ग वेगळा करून पुढे जात असतात.. त्यांची लांबवर पसरलेली नक्षी .. एखाद्या वळणावर शेवटच्या डब्यातून दिसलेली आपलीच पूर्ण ट्रेन .. आणि एक स्टेशन सोडल कि लगेच लागलेली पुढच्या स्टेशनची चाहूल.. इथे निसर्गालाही घाई .. आपल्या सगळ्या लेकरांना भेटवतो तो तेवढ्या थोडक्या वेळात.. लांबवर पसरलेले डोंगर.. मधूनच डोंगराच्या पोटातून जाणारी आपली ट्रेन.. लांबवर पसरलेल नीळ शार खाडीच पाणी.. त्यात मिसळलेला chemicals चा सुगंध(?) ट्रॅक च्या कडेनी लावलेला भाजीपाला .. खडीतून मान वर काढणारी छोटीशी रोपटी.. वेगवेगळ्या हिरव्या रंगांना छेद देणारा एखादा बहावा नाहीतर गुलमोहर.. यांना tangent जाणारे निळे काळे आकाश आणि त्याचे बदलत जाणारे रंग..
अशा वेळी आपणच बादशहा असल्यामुळे जी धावपळ आपणही रोज सकाळ संध्याकाळ करत असतो ती आता त्रयस्थपणे बघता येते.. त्या ३० सेकंदात सगळं जग इकडून तिकडे धावत.. एकाच वेळी platform १ आणि ३ वर आलेली लोकल.. जिवाच्या आकांताने जिने चढून उतरून पलीकडे पोचलेले लोक.. एक मुंगळ्यांसारखी रांग railway track वरून पलीकडे जाणारी.. अर्धी तुळशीबाग इथे डोळ्यासमोर लटकत असते.. ते सगळे व्यापारी उतरून दुसऱ्या ट्रेन मध्ये पोचलेले असतात.. तेवढ्यात एकदम सोनचाफा घमघमतो आणि लक्षात येत चाफ्याची फुलं आणि मोगऱ्याचा गजरा असलेली पाटी घेऊन एक मावशी आत चढलीए.. गर्दी चेंगरा चेंगरी बघत आणि १०- ५ शिव्या ऐकत असतानाच ट्रेन horn मारते आणि अजून धावणाऱ्यांच्या पायाचा वेग वाढतो..
Platform वर समाजातली सगळ्या स्तरातली माणसं क्षणात नजरे समोरून जात असतात.. शाळेतून मुलाला घेऊन जाणारी आई, कांगारू बॅग पोटाला लावून मुलाला day care मधून घरी घेऊन जाणारी आई. एखादे धापा टाकत थकून थांबलेले काका, college मधल्या मुलांचा घोळका, पोटाला हात लावून दिवस असताना ट्रेन पकडणारी मुलगी आणि रडणाऱ्या बाळाला पाजायला आडोसा शोधणारी आई सुद्धा.. एकमेकांना मिठी मारून क्षणात वेगळ्या ट्रेन साठी पाळलेले एखादे couple, टाळ्या वाजवत जाणारेही आणि भडक make up केलेल्या बायकाही.. ऑफिस मधून घरी जाणारे चाकरमाने सुटाबुटातले फक्त वेळ वाचावा म्हणून ट्रेन नि प्रवास करणारेही.. शाळेत एकमेकींचे हात धरून सांभाळून जाणाऱ्या मुली.. एखादे गावाकडून आलेले काका काकू त्या गर्दी कडे आता up down east west कसे ओळखायचे म्हणून हताश होऊन बघत असतात.. सराईत रोज प्रवास करणारे कानात head phone घालून video बघत बघत किंवा mobile वर game खेळात गर्दीतून वाट काढत असतात.. प्रत्येकाचे रंग रूप वय वेगळे.. त्यांचे मार्गही आणि विचारही.. पण एका सामान धाग्यांनी बांधलेले तो म्हणजे समोर आलेल्या ट्रेन मध्ये क्षणात सामावून जाणे.. परत हॉर्न देऊन गचकन धक्का देत ट्रेन आपला स्पीड घेते..
हे सगळं आपल्या समोर दार ३ मिनिटांनी घडत राहतं.. ८-१० वेळा तरी.. आणि मग एक ओळखीचा वास येतो..(आता हे काय प्रकरण आहे ते कळायला गाढ झोपेत हटकून आपल्याच स्टेशन ला जग यायची किमया साधायला लागते.. )आता परत आपले मोकळे सोडलेले मन आपल्या जवळ घ्यायचे.. केसाचा वरती बुचडा बांधून टाकायचा.. लॅपटॉप बॅग पाठीऐवजी पोटाला लावायची.. आपली सीट कोणीतरी बुक केलेलीच असते त्याला खूण करून जागा द्यायची.. आणि गर्दी ला मागे सारत स्टेशन येईपर्यंत दरवाज्यात जाऊन उभे राहायचे.. ट्रेन थांबली कि लगेच या गर्दीचा एक भाग होण्यासाठी..
हे सगळं आपल्या समोर दार ३ मिनिटांनी घडत राहतं.. ८-१० वेळा तरी.. आणि मग एक ओळखीचा वास येतो..(आता हे काय प्रकरण आहे ते कळायला गाढ झोपेत हटकून आपल्याच स्टेशन ला जग यायची किमया साधायला लागते.. )आता परत आपले मोकळे सोडलेले मन आपल्या जवळ घ्यायचे.. केसाचा वरती बुचडा बांधून टाकायचा.. लॅपटॉप बॅग पाठीऐवजी पोटाला लावायची.. आपली सीट कोणीतरी बुक केलेलीच असते त्याला खूण करून जागा द्यायची.. आणि गर्दी ला मागे सारत स्टेशन येईपर्यंत दरवाज्यात जाऊन उभे राहायचे.. ट्रेन थांबली कि लगेच या गर्दीचा एक भाग होण्यासाठी..
👌👌
ReplyDelete