Monday, May 27, 2019

संभ्रम

गंध प्रहराचे २ - पहाट कि सायंकाळ 

ही मनाची अशी अवस्था आहे.. एखादा गुंता जेवढा सोडवायचा प्रयत्न करू तेवढा तो वाढत राहतो.. आणि आपल्याला कळतच नाही की यानंतर आता पुढे काय? पुनश्च हरी ओम का एक भयाण रात्र? एका नवीन पहाटेची आशा का वाढत जाणारा अंधकार.. खूप विचार करून देखील गुंता सुटलाच नाही म्हणून कवितेचे नाव पण दिले आहे संभ्रम.. 

ही उर्वी काजळलेली , 
क्षितिजावर अंधुक लाली 
पाखरांची होता किलबिल, 
ती जरा संभ्रमित झाली 

रवितेजाचा पुसटसा भास, 
प्राजक्ताचा दरवळ खास 
कळेना हा कुठला काळ, 
उगवती पहाट कि सायंकाळ 

तानपुरा ती छेडून बसली, 
ती पुनश्च शंकित झाली 
गावा यमन कि भूपाळी, 
ब्रम्हानंदी लागली टाळी 

-- अवनी गोखले - टेकाळे 

1 comment: