एक दिवस असा येतो कि नावीन्य संपून ही लोकल train आपल्या सवयीची होते.. ७. ५९ म्हणजे ८ नाहीत हे लक्षात येत.. रोज ८० मिनिटाचा ट्रेन चा प्रवास.. जाताना ४० येताना ४० .. एवढा वेळ रिकामा मिळायला लागतो अचानक.. bike चालवताना traffic, clutch, break यामध्ये गुंतलेलं असतं डोकं.. इथे ट्रेन ला कितीही गर्दी असो पण एकदा तिच्या पोटात शिरलं कि आपण रिकामेच.. आपल स्टेशन येईपर्यंतचा हा वेळ फक्त आपलाच हक्काचा..
मग एक दिवस दोन सुया आणि एक दोन लोकरीचे गुंडे घातले लॅपटॉप बॅग मध्ये.. खूप वर्षात हातात सुया घेतल्या नव्हत्या.. त्यामुळे काही वेळ nostalgia मध्ये गेला आणि काही वेळ सुईवर पहिला टाका कसा घालायचा हे आठवण्यात गेला.. साधा सोपा आणि traditional प्रकार म्हणजे ताटावरचा रुमाल करून बघायचा ठरवलं.. एकदा सुईवर टाके विणले आणि कधी त्यात रमले कळलंच नाही.. ट्रेन मध्ये जोपासता येणारा तसा हा सोपा छंद आहे.. जास्त फापट पसारा नाही.. पाहिजे तेव्हा सुई काढली आपला स्टेशन आला कि लगेच भरून टाकला परत बॅग मध्ये..
कधी ladies compartment मध्ये गप्पा मारत मारत तर कधी बाहेर बघत स्वतःच्या विचारात हरवत एक एक पाकळी आकार घेऊ लागली.. या सुयांनी सगळ्या महिला मंडळाला बोलतं केलं.. कोणी आपण कसे काही वर्षांपूर्वी शिवणकाम विणकाम वगैरे करत होतो पण आता कामाच्या गडबडीत कसं होत नाही ते सांगितलं.. कोणी वेगळे वेगळे पॅटर्न share केले.. तर कधी मोठे मोठे sweater, शाली विणणार्या बायका पण भेटल्या.. एका काकूंनी commit केला कि हे झाल्यावर त्या मला crochet शिकवणार आहेत.. बघू कधी योग येतो ते..
लहानपणी खेळताना पळून पळून दमलो कि मूठ पालथी करायचो.. त्याला थुंकी लावून म्हणायचं time please .. धापा टाकून दम खायचा आणि परत पळायला लागायचं.. खऱ्या आयुष्यात हे time please इतकं सोपं असतं का माहित नाही.. पण आपणच थोडा आपल्या धावपळीला छेद द्यायचा.. आपलंच मन थोड गोंजारायच .. digital world ला थोडा वेळासाठी म्हणायचं time please.. आणि मग आपलं station आलं कि पालथी मूठ सरळ करायची.. आणि परत एकदा आपल्या तळहातावरच्या रेषांमागे पळायला तयार व्हायचं..
No comments:
Post a Comment