समोर TV चालू होता.. छोटे सूरवीर गात होते.. त्यांची मेहनत त्यांच्या गळ्यातून आपल्या मनात उतरत होती.. आणि एक तार सप्तकातला आवाज काळीज चिरून गेला.. "खेळ मांडला.. " तो आवाज आणि ते गाणं.. मन एकदम आठ वर्ष मागे हरवून गेलं..
Office ची social activity होती.. एका blind school मध्ये शिकवायला जायचे होते.. तेव्हा प्रोजेक्ट second shift चा असल्यामुळे सकाळी एखाद तास काढणे सहज शक्य होते.. म्हणून मी आणि एका मैत्रिणीनी enroll केले.. थोडा उत्साह आणि थोडी साशंकता अशा संभ्रमात आम्ही पत्ता शोधत शाळेत जाऊन पोचलो.. नुकतच शाळेचं नवीन वर्ष सुरु झालेलं.. हवेत भरलेला पाऊस आणि ground वर football खेळणारी धमाल मुलं.. ही आमची शाळेशी झालेली पहिली ओळख.. सगळी मुलं सैराट फिरत होती आणि आम्ही भांबावून principle ची cabin शोधत होतो.. principle या नावाभोवतीच असं काही वलय आहे कि आत जाताना धडधड होतेच मग काम काही का असेना.. पण आत एक प्रसन्न व्यक्तिमत्व आमची वाट बघत बघत होत.. त्यांनी आम्हाला साधारण शाळेचं routine सांगितलं आणि आमची काय मदत त्यांना अपेक्षित आहे ते पण सांगितलं.. आठवड्यामध्ये ३ दिवस एक एक तास.. त्या वेळात त्यांना पुस्तक वाचून दाखवायची.. जमेल तेवढा संवाद साधत त्यांना बोलत करत विषय समजून सांगायचा.. माझ्या कडे नववी चा वर्ग आला होता.. सरांनी क्लास monitor ला बोलावून आमची ओळख करून दिली आणि मग मी त्याच्या मागोमाग निघाले..
तो मुलगा जो धूम पळाला तो direct second floor वरच्या वर्गात जाऊनच त्याने श्वास घेतला.. पावसानी निसरड्या झालेल्या corridor मधून आम्ही सावकाश चालत असताना तो मात्र वर्गात जाऊन त्याच्या bench वर बसला सुद्धा होता.. वर्गात जाता जाता सहज नजर फिरत होती सगळी कडे.. मला एकदम माझ्या शाळेची आठवण झाली.. असेच मध्यभागी पटांगण आणि चारी बाजूनी इमारत.. वर्गात धिंगाणा घालत आपल्याच विश्वात हरवलेली मुलं.. त्यांना मार्ग दाखवणारे शिक्षक.. पटांगणात चालू असलेले मैदानी खेळ..
पहिला दिवस तर ओळख परेडच चालू होती.. आणि हळू हळू कधी हे चेहरे ओळखीचे होऊन गेले कळलंच नाही.. त्यांना पण आता माझी सवय झाली होती.. मी काही न बोलता वर्गात जाऊन उभी राहिले तरी त्यांना ते आता समजायला लागल होत.. प्रचंड बोलकी असणारी हि मुलं.. बहुतेक सगळे तिथेच हॉस्टेल ला राहायचे त्यामुळे कायम एकत्र असायचे.. त्यांना सगळंच सांगायचं असायचं.. त्यांनी संध्याकाळी काय काय केलं.. कुठली पुस्तकं वाचली/ऐकली, कुठले खेळ खेळले, कशी मस्ती केली आणि त्यांच्या छंदांबद्दल सगळंच.. हे सगळं सांगून झाल कि मग आमचा अभ्यास सुरु व्हायचा.. पुस्तक वाचून दाखवत, त्याच्या अनुशंघाने गप्पा मारत विषय उलगडून दाखवायचा छोटा प्रयत्न.. सुरवातीला खूप जड गेल मला आपले विचार त्यांच्या पर्यंत पोचवणं.. पण मुळात त्यांना शिकायची आवड आणि शिकवायला येणार्यांची असणारी किंमत यामुळे हळू हळू ते tuning जमत गेला.. आपण काय पुस्तक वाचून दाखवणारे यांना.. असच व्हायचं कधी कधी .. कारण tape recorder वर ऐकून ऐकून धडेच्या धडे पाठ होते त्यांचे.. languages , social sciences सोपे जायचे त्यांना.. science maths साठीच थोडी मदत हवी असायची.. त्यांना आलेल्या शंका सोडवणे हेच main काम होता..
त्यांची एक वेगळीच दुनिया होती.. हुशार, खोडकर आणि परिस्थितीची जाणीव असणारी अशी हि मुलं.. आपला कुठला छंद आपल्याला पुढे जाऊन दिशा देऊ शकेल का हे बघण्याकडे त्यांचा कल जास्त होता.. गायन, musical instrument वाजवण्याची आवड, गणपती मध्ये ढोल वाजवायला जाणे, चित्रकला. indoor / outdoor games प्रत्येकाचा छंद वेगळा.. आपल्याला जगण्याचे धडे देणारे हे छोटे शूरवीर..
आज या मुलांची नावं लक्षात नाहीत.. कोण काय करत असेल माहित नाही.. सतत touch मध्ये राहू म्हणत निघाले होते शेवटच्या दिवशी पण नाही जमलं नंतर परत जायला.. याचा guilt वाटतो हि कधी तरी.. पण त्यापेक्षा समाधान हे वाटत कि या दिवसात आपण त्यांना आणि त्यांनी आपल्याला काय दिलं.. शेवटच्या दिवशी सगळ्यांना पुढे येऊन बोलायला सांगितलं होत.. विषय तुमच्या आवडीचा.. तुम्हाला भावलेलं, अनुभवलेलं काहीही.. प्रत्येकाचं बोलणं स्पर्शून जाणारं आणि वर्णन तर इतकं चपखल कि डोळे मिटून उभा राहिल तरी आपल्या डोळ्या समोर चित्र उभं राहिल.. सगळ्यात शेवटी जो मुलगा उभा राहिला तो खूप छान गाणं म्हणायचा त्यामुळे बोलून झाल्यावर फर्माईश तर होणारच होती.. त्याची खूप गाणी आम्ही ऐकली होती .. स्पष्ट, गहिरा आणि ठेहराव असणारा आवाज.. तो क्षण थांबवून ठेवला त्यानी तसाच आणि तार सप्तकातला त्याचा आवाज काळीज चिरून गेला..
दावी देवा पैलपार पाठीशी तू रहा उभा..
ह्यो तुझ्याच उंबऱ्यात खेळ मांडला ..!!!

No comments:
Post a Comment