Monday, May 16, 2016

कविता

पाहता मागे फिरुनी तटस्थ
कळेना मला  हि मीच कि त्रयस्थ !
उमजेना मला कोणते  रुप साजिरे
ते उनाड स्वच्छंदी कि हे गहिरे !!

तेव्हा पाकळीत होता दरवळ सुगंधी
सायंकाळ ती अन मारवा मृद्गंधी !
आता उमलती कळी ही मग्न धुंदी
होता प्राजक्त तो हा परिमळ निशिगंधी !!

तेव्हा नदीच्या किनारी तो घुमला
आवेग मेघ मल्हार तो निथळला !
आता भिडती सरी नभांगणाला
होता वळीव तो हा श्रावण बरसला !!

तेव्हा ती कविता होती ग मुक्तछंद
खुले आभाळ अन वादळ हे बेधुंद !
आता गुंफिले त्यात यमक प्रास बंध
नेहमीच साजिरी ती गहिरी अन स्वच्छंद !!


7 comments: