Tuesday, August 7, 2012

वही असली एकुलती तरी..

वही असली एकुलती तरी त्यात आठवणीचा ठेवा आहे ...
एखाद्या पानाला सुकल्या गुलाबाचा सुवास आहे..
एखाद्या शब्दात अडकला तुझा रेशमी आभास आहे..
विरह झाला खूप, तुझा प्रेमळ सहवास हवा आहे ...

वही असली एकुलती तरी त्यात आठवणीचा ठेवा आहे ...
तेव्हा होती श्वासांना ऊब.. आता हवेत दाटला गारवा आहे..
कातर वेळी रंगले आभाळ, सुरात घुमतो हा मारवा आहे..
विरह झाला खूप, तुझा प्रेमळ सहवास हवा आहे ...

वही असली एकुलती तरी त्यात आठवणीचा ठेवा आहे ...
धा गे ती ता. .सुरु झाल्यावर साद घालतो तुझा केरवा आहे
नुसता गाता तू मेघ मल्हार हवेत पसरता ओलावा आहे..
विरह झाला खूप, तुझा प्रेमळ सहवास हवा आहे ....

वही असली एकुलती तरी त्यात आठवणीचा ठेवा आहे ...
मखमली नात्यात गुंफलेली  ही नाजुकशी तार आहे..
रेशमी पदराला लाभली ही जरतारी किनार आहे..
विरह झाला खूप, तुझा प्रेमळ सहवास हवा आहे ....

No comments:

Post a Comment