Sunday, February 6, 2011

कृष्णछाया

मंदार गद्रे च्या blog वर ही कविता वाचत होते.. "कृष्णछाया".. वाचता वाचता त्याच reference मध्ये अजून काही ओळी सुचत गेल्या.. आधी त्याची कविता paste करत आहे नंतर मला सुचलेल्या ओळी लिहिल्या आहेत..

कृष्णछाया

दीस मावळला आता त्यात हरवली वाट
शोधे देवकीचा देव कान्ह्यासाठी एक घाट

दीस निवळला आता त्यात हरवली जाग
राख गोकुळाच्या मनी, आग उद्धवाचा राग

दीस झाकोळला आता त्यात हरवली राधा
सावळ्याच्या आठवांची वेडीखुळी भूतबाधा

दीस गढूळला आता त्यात हरवले रान
श्याम कात-चुन्याविना मीरा काजळले पान

दीस आकळला आता त्यात हरवली आस
होतो अर्जुनाच्या मनी कर्तेपणाचा निरास

----------------------------------------

दीस आसावला आता त्यात हरवला नाद
शोधे माय यशोदेची कान्हा आतुरली साद

दीस भंगला आता त्यात हरवला मान
कृष्णा असून तुडवे रोज नित्य नवे रान

दीस अंधारला आता त्यात हरवला कर्ण
कान्हा भेटवी कुंतीला, कसा बदलला वर्ण

दीस पेटला आता त्यात हरवली गीता
सारी यादवी माजली,कशी भंगली शांतता

दीस हरवला आता त्यात हरवला "लल्ला"
होता विसावला थोडा, घाव वर्मी हो लागला

No comments:

Post a Comment