"पोरगी आणि motor cycle ??", "नसता आगाऊपणा सांगितला आहे कोणी? ", "काय हे! स्वतःला दमडी कमवायची अक्कल(???) नसेल आणि इकडे बापाच्या जीवावर गाड्या उडवतात.. "(तरी बरं neck-less सारखं company चं I -card होता त्यावेळी गळ्यात.. ), "अहो, ती बघा.. शेजारची मुलगी"(अहो चक्क(!!) पुण्यातल्या सिग्नल ला थांबले आहेत आणि खास सदाशिव पेठेतले प्रेक्षणीय चेहरे बघण्यात सिग्नल चा वेळ सार्थकी लावत आहेत .. स्थळ: लक्ष्मी रोड.. ), "जीव वर आला आहे वाटत.. "(वर यायला ते काय gas वर उकळणार दुध आहे का??),"अरे भावाची असेल bike .. shining मारायला कधीतरी चालवत असेल"(जाता जाता confess करायला हरकत नाही.. तो "अरे" बरां होता जरा.. त्यामुळे थोडीशी shining मारायला हरकत नव्हती पण सिग्नल सुटला तेवढ्यात.. आणि मी लगेच वास्तवात येऊन first gear मध्ये रस्ता क्रॉस करायला जमेल का मधेच second टाकावा लागेल या विचारात हरवले), "मुलींनी इज्जतीत राहावा.. फार तर मोपेड चालवावी.. उगाच नाही तो शहाणपणा करायला जाऊ नये.."( सगळ्याच मुली bike चालवायला लागल्या तर मागची seat मळलेली राहील ना!!!)
अशी सगळी वाक्य वाचल्यावर कळलंच असेल.. पहिल्यांदाच "सदाशिव पेठे"तून splendor चालवत होते.. एकतर थोडी tention मधेच चालवत असेन बहुतेक तेव्हा.. आणि रस्त्यातली लोक इमाने इतबारे सदाशिव पेठी टोमणे मारत आपला "पेठी पणा" सिद्ध करत होते.. प्रत्येक गोष्ट ही आपण टोमणे मारण्यासाठीच घडते.. आणि रस्त्यावरून जाणार्या येणार्याला विनाकारण सल्ले अथवा टोमणे दिलेच पाहिजेत तरच सदाशिव पेठेत "reshion card" मिळता!!! .. आणखीन एक सदाशिव पेठी गुण.. क्षुल्लक गोष्टीची जाहीर चर्चा झाली पाहिजे . म्हणून तर हे सगळं मी लिहित आहे.. माझ्याकडे पण आहे ना सदाशिव पेठी reshion card .. त्यामुळे असे लिखाण करायचा जन्मजात हक्क मिळाला आहे मला..
घरात मी खूप दिवस चेष्टेत म्हणत होते मला bike घ्यायची कधीतरी .. पण तेवढाच व्हायचा विषय.. मी पण फार serious नव्हते.. या दिवाळीत विषय निघाला परत.. तुला काय? यावर मी एकदम सज्जन सारखे उत्तर दिले.. "मला काहीच नको आहे .. माझ्याकडे जे पाहिजे ते सगळं आहेच कि".. "नाही पण तरी?", "घेतली तर Motor Cycle नाहीतर काहीच नको"... मी एकदम खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी या पेशवाई थाटात सांगितले.. "नाही मग ते पहिला उत्तर जास्त चांगला होता :) नाही म्हणजे तुला तशी गाडी घ्यायची आहे तर activa वगैरे घेऊ.. pleasure पण चांगली आहे.." मी परत थाटात.." नाही तसा असेल तर मला काही गाडीची गरज नाहीये.. scooty पळतेच आहे कि अजून..(daily 50km याप्रमाणे तिचा लवकरच खुळखुळा व्हायच्या मार्गावर होता त्यामुळे हा पर्याय तसाही निरर्थक होता :P) " खूप प्रयत्नानंतर पुसटसा होकार मिळाला.. गाडी main stand वर घेऊन दाखवायची, धक्का मारून दाखवायची तर थोडा विचार करण्यात येईल.. आमच्या बंधूंनी थोडी आशा दाखवली.. हळू हळू आई, बाबा, ज्योती सगळे थोडासा support दाखवायला लागले..
खरी मजा इथून पुढेच होती.. bike इथे येत होती कोणाला? एकदा आशेचा किरण दिसल्यावर मग लगेच मित्राला phone .. गाडी शिकव आणि त्याच दिवशी शिकायला सुरवात.. company मधून घरी आलं कि लगेच purse फेकायची आणि गाडी शिकायला पळायचं.. scooty , car वगैरे मी यायला पाहिजे म्हणून शिकले होते पण त्यात फार काही excitement वगैरे नव्हती पण आत्ताचा हा उत्साह म्हणजे लहानपणी cycle शिकताना असतो तसाच होता.. I was struggling for my passion so तो जोश काही वेगळाच होता..
भर चौकात गाडी बंद पडणे, चुकीचे gear टाकणे, clutch लवकर सोडून देणे, पन्नास किका मारायला लागणे, डाव्या हातात break आहे असं समजून (scooty ची सवय!!) चुकून clutch दाबणे, आणि हे सगळे उपद्व्याप दुसर्या दिवशी कंपनी मध्ये सगळ्यांना उत्साहात सांगून बेजार करणे, सगळे सोपस्कार झाले..
त्या नंतर चे सल्ले.. "bike शिकणं वगैरे ठीक आहे पण जरा औकातीत राहायचं.. "(इथे एकदम सभ्य शब्दात लिहिलं आहे औकातीत वगैरे पण मला *** ऐकायला मिळाल्या होत्या तेव्हा मित्रांकडून), "उगीच ते dress मध्ये bike vike नको ग.. बकवास दिसत एकदम..","झेपतेय का.." , "तू भीड बिनधास्त आम्ही आहोत ना मदत लागली काही तर..","bike ची हौस असतेच पण मग आम्ही आहोत ना.. आमच्या bike वर मागे बसू शकतेस तू.. "(या सल्ल्यावर काय सांगू.. मला भीती वाटते.. मी स्वत खूप rough आणि speedy गाडी चालवते पण कोणाच्या मागे बसायची भीती वाटते आणि समोर वाहन दिसलं कि मी जोरजोरात आरडा-ओरडा करते..), "तुमको जहा भी चाहिये हम test drive लेके आयेंगे,, सारे quotations लेके आयेंगे हम.. तू चला बिनधास्त . हम है ना तेरे साथ.. ","Splendor काय घेतेस? फक्त Karizmach फारतर(??) Hunk , Fazer , SZ!!..(हे सांगणारी व्यक्ती लुना चालवायला पण घाबरते..) ","तुला काय प्रोब्लेम नाही काही.. height वगरे छान आहे एकदम..","बाई ग, अजून किती accidents करून घ्यायचा विचार आहे.. (हि मात्र सत्य परिस्थिती असल्यानी प्रत्येकाच्या drive safely .. या common वाक्याची मात्र मी चेष्टा नाही करणार.. ya , I will drive safely .. but please don 't say drive slowly .. because I can 't :-) )"
अशा अनेक प्रेमळ सल्ल्यान्नंतर मी खरच मनापासून विचार केला.. मला खरच motor cycle चालवायची आहे आयुष्यभर का फक्त जोश म्हणून मी शिकत आहे? पण नाही.. रोज 50km driving म्हणजे साध्या मोपेड चा आणि माझा खरच खुळखुळा होऊन जाईल काही दिवसांनी.. खूप विचार केला, positive पेक्षा negative side चा जास्त विचार केला as usual .. and then done !! घरच्यांनी तर खूप चांगला support केला.. आणि भाऊबिजेच्या सुमुहूर्तावर माझा "शेरा" घरी आला..
सावधान!! चालक शिकत आहे अशी पाटी घेऊन बिनधास्त घुसले गावात.. खूप भटकायला सुरवात केली आहे गाडीवर.. आता cuts मारता यायला लागले आहेत, गाडी ढकलायला जमते, सिग्नल तोडता यायला लागले आहेत skillfully (हो, पुण्याची ती पण एक गरज आहे, नाहीतर मागचे लोक ठोकतील आपल्याला आणि वर आपल्यावरच डाफरतील थांबून का राहिलात म्हणून.. ), city area मध्ये continuous gear changing जमायला लागला आहे(पहिल्यांदा हा उपद्व्याप लक्ष्मी रोड वर केल्यावर गड जिंकल्याचा भास झाला होता.. ), highway वर मस्त सुसाट चालवता येते आहे.. .. आता waiting to complete next mission.. Delhi to Leh .. on one nice sports bike!!!
Wa, nice blog....
ReplyDeleteN ya please drive carefully... n i mean it...
And you have one more year to get all your skills tuned, I will be back in Pune and we will have race in sadashiv peth...be ready :)
ohoo chitts.. harne vali sharth mat lagao.. :) me tula spirit var cut marun gele hote nilayam chaukat.. tar bike alyavarchi baatch sod.. race in Sadashiv peth!! done.. I am ready..
ReplyDelete:) :) thats t spirit :) :)
ReplyDeleteउत्कृष्ट आणि सुरेख ..!
ReplyDeleteअवनी,तुझा ब्लॉग वाचला...एकदम छान लिहिले आहेस..अस्सल पुणेकरी स्टाईल मध्ये...मस्त मस्त मस्त..!!!
ReplyDelete@manish, amol..thanx..
ReplyDelete