हा अनुभव तर प्रत्येकानीच घेतला असेल... काही लोक आपल्याला खूप थोड़ा वेळासाठी भेटतात… नंतर ते कुठे जातात? काय करतात? काहीच माहित नसत... पण तरी कुठे तरी आपल्या मनात ते त्यांची छाप सोडून जातात अणि कायमचे लक्षात रहातात... कदाचित एखादी ८० वर्षांची आजी असेल नाही तर एखादी ८ वर्षांची मुलगी असेल... स्नेहल चं अणि माझं या विषयावर बरच बोलण झालं होतं अणि त्यांच्या विषयी काही लिहिण्याचा प्रयत्न दोघींनी मिळून केला आहे…
समुद्राच्या लाटा सळसळत वाहताना,
काठावर काही शिल्पे ठेवून जातात!!
तसे काही माणसे अलगदपणे आयुष्यात येतात,
आणि मनाच्या गाभार्यात आठवणी ठेवून जातात!!
अनेक नात्यांच्या बंधाने जीवन विणले जाते,
त्यातल्या काही नात्यांना नाव द्यावेसे वाटत नाही!!
असे हे बंध रेशमाचे कधीच उकलता येत नाहीत,
या गुम्फलेल्या नात्यांचा कधीच अंत होत नाही!!
अबोल अश्या ओठान्मधले शब्द जाणले जातात,
हसर्या चेहर्या मागच्या व्यथा न सांगताच समजतात!!
मनावर अलगदपणे ही नाती फुंकर घालतात,
अन नकळत मखमली स्पर्श करून जातात!!
काही माणसे आपल्याबरोबर काही क्षणच असतात,
पण आयुष्यभर आपल्या आठवणीत राहतात!!
परके वाटू लागते आपलेच प्रतिबिम्ब आपल्याला,
इतका आपल्यात बदल घडवून आणतात!!
अशी नाती आयुष्यात जगायचं कसं शिकवतात,
आपल्याला आत्मविश्वास अणि धीर देवून जातात!!
जगाच्या गर्दीत आपण हरवले असताना,
तोल सावरून, हात देवून आधारस्तम्भ होतात!!
क्षणिक अशी बिन नात्यांची नाती मनात घर करून जातात,
भेटली नाहीत परत तरी सतत आठवत रहातात!!
असे हे बंध आयुष्यात शेवट पर्यंत जपले जातात,
मनाच्या किनार्यावर हळुवार ठसा उमटवून जातात!!

Chan aahe ... :)
ReplyDelete