Friday, October 9, 2009

१५ august आणि border वरचा जवान...

I think, there is no need of introduction... जसे विचार मनात येत गेले तसे लिहिले गेले...

१५ august, रस्ते सजतात, जेंडे फ़डकतात,
रेकॉर्ड्स वाजतात, भाषणही होतात,
हे सोपस्कार जाल्यावर आपण देशाचे सुजाण नागरीक आहोत,
याची जाणीव नागरीकांना होते
अणि रेकॉर्ड्स बरोबरच तीही हवेत विरून जाते!!!

त्याच वेळी तो border वर रात्र जागवत असतो,
हातात pistol, डोक्यात जोश, मानत घरच्यांना आठवत असतो!!

घरी येणार तो म्हणून जेव्हा घरच्यांचा आनंद ओसंडत असतो,
घरच्यांना भेटायचा ,म्हणून तोही तेव्हा हळवा जालेला असतो!!

आठवत असतो तो, जेवा घरी येऊंन गेला होता........
आजीचा मायेचा हात केव्हा फिरला होता,
आजोबांच्या पायात तेव्हा बळ आले होते,
अणि आजारपणात पहिल्यांदा गादीवरून ते उठले होते!!

आई डोळ्यतलं पाणी लपवू बघत होती,
तो निघताना समजूत घालत होती....
त्याची का स्वत:ची??
काका... भाची हाक देत असते
जाऊ नको ना रे, मनोमनी सांगत असते,
भान्डायचं आहे तुज्याशी खूप, खूप सांगायचा राहिलं आहे,
तुज्याबरोबर गप्पात परत रात्र जागवायची आहे,
लवकर परत ये....
नि:शब्द भाऊ सांगत असतो!!

"तिच्या " पाणीदार डोळ्यातून सगळा संयम वाहत असतो,
मी लवकरच परत येइन तो फक्त नजरेने समजावत असतो,
शांत, करारी चेहरा ठेवून तो फक्त तिला नजरेत साठवत असतो,
"तिच्या " डोळ्यातून तेव्हा तोही बरसात असतो!!

काका काकू तेवढ्यात bag भरत असतात
आत्या uniform ला इस्त्री करत असतात!!

या गोंधाळात बाबा कुठे असतात??
सगळ्यान्ना शांत करत असतात,
तो वेळेत पोचावा म्हणून धावपळ करत असतात
घाईनी बाहेर पडून रिक्शा आणायला धावतात
अणि रिक्षात मात्र एकटेच डोळे पुसून घेतात!!

तो निघताना कोणीच बोलत नही,
हळव्या त्या नि:शब्द शांततेत फक्त वारा वाहत असतो
भरला मेघ फक्त बरसायचा बाकी असतो!!!

१५ august, तो border वर रात्र जागवत असतो,
मनात घरच्यांना अणि मित्रांना आठवत असतो,
तेव्हाच रस्त्यावर रेकॉर्ड्स वाजत असतात,
लोक "स्वतंत्र्यदिन " साजरा करत असतात!!!!

No comments:

Post a Comment