अशी निराशा येते कधी तरी... जे मिळवण्याची धडपड खूप दिवस करत असतो... ते मिळेल का नाही याची शाश्वती नसते... कधीतरी अशा problems ला face करायला लागतं ज्याचा विचार पण नसतो केलेला... अशी एक situation... तेव्हा मनाला आलेली निराशा आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी लिहिलेले काही आशा वादी विचार... पहिली कविता मला माझ्या मैत्रिणीने लिहून दिली त्यावर उत्तर म्हणून काही लिहिण्याचा प्रयत्न केला आहे...
हसता हसता आज अचानक डोळे भरून आले
कुठलेसे अदृश्य असे सत्य स्पर्श करून गेले!!
जगता जगता कळलं जगण सोपं नाही
मिळण्याच्या आतच हरवतं बरंच काही!!
मिळवलेलं सांभाळण्याचा खूप प्रयत्न करते
पण फाटक्या झोळीत फक्त निराशाच उरते!!
तरीही मी थकले नाही, अजुन लढते आहे
आयुष्याच्या गुलाबाचे काटे काढ़ते आहे!!
"उत्तर:"
खडतर आहे मार्ग तरी चालत रहायच आहे
याच खाचखळग्यातून पुढे नंदनवन गाठायच आहे!!
अजून तर खऱ्या सत्याशी ओळख व्हायची आहे
इतक्यात धीर सोडू नको, ही तर खरी सुरवात आहे!!
सोपं नही जरी तरी अशक्य नक्कीच नाही
मन खंबीर ठेव, हिम्मत कधी हरायची नाही!!
स्वप्न मोडल तरी स्वप्न बघण सोडायचं नाही
ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण सोडायच नाही!!
खूप अडचणींनंतरच यशाची पायरी दिसते
काट्यांमुळे तर गुलाबाची खरी किंमत कळते!!
सहज मिळालेले यश पण कधी मानवत नाही
म्हणूनच काटे काढू नको, त्याशिवाय गुलाबाला काहीच अर्थ नाही!!!
हसता हसता आज अचानक डोळे भरून आले
कुठलेसे अदृश्य असे सत्य स्पर्श करून गेले!!
जगता जगता कळलं जगण सोपं नाही
मिळण्याच्या आतच हरवतं बरंच काही!!
मिळवलेलं सांभाळण्याचा खूप प्रयत्न करते
पण फाटक्या झोळीत फक्त निराशाच उरते!!
तरीही मी थकले नाही, अजुन लढते आहे
आयुष्याच्या गुलाबाचे काटे काढ़ते आहे!!
"उत्तर:"
खडतर आहे मार्ग तरी चालत रहायच आहे
याच खाचखळग्यातून पुढे नंदनवन गाठायच आहे!!
अजून तर खऱ्या सत्याशी ओळख व्हायची आहे
इतक्यात धीर सोडू नको, ही तर खरी सुरवात आहे!!
सोपं नही जरी तरी अशक्य नक्कीच नाही
मन खंबीर ठेव, हिम्मत कधी हरायची नाही!!
स्वप्न मोडल तरी स्वप्न बघण सोडायचं नाही
ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण सोडायच नाही!!
खूप अडचणींनंतरच यशाची पायरी दिसते
काट्यांमुळे तर गुलाबाची खरी किंमत कळते!!
सहज मिळालेले यश पण कधी मानवत नाही
म्हणूनच काटे काढू नको, त्याशिवाय गुलाबाला काहीच अर्थ नाही!!!
No comments:
Post a Comment