Friday, October 9, 2009

त्याची आठवण... आणि तो भेटल्यावर...

अचानक रात्री मला स्नेहल चा phone आला... अवि अग काहीतरी सुचलयं ... त्याच्या आठवणींनी मनाची कशी अवस्था होते ते मी लिहिलय पण अर्धवट वाटत आहे... आणि म्हणाली कर आता पूर्ण... काय ग स्नेहल, आपल कुठलच लिखाण एकामेकीन्शिवाय पूर्ण होत नाही का ग??

स्नेहल:
निष्पर्ण जाडावारील एक पान, उगाचच माज्याकडे बघून हसले
अन त्याची नजर खूप काही बोलून गेली...
मन हळवे होत गेले आणि त्या पानातच तुजे प्रतिबिम्ब दिसले
उलगडत गेले सारे क्षण आणि आठवणीही
वाटले नव्हते एव्हडे परके होवून जातील दिवस अन तुही...

पूर्वी तुज्याआठवणीच्या सरी येत होत्या
आता त्याचा पाउस मुसळधार जाला,
आतुरला एक थेम्ब जसा धरणीला भेटण्यास
तुला भेटण्यास जीव तसाच आतूर जाला...

आता तो भेटल्यावर काय ते लिहून मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला....

मेघदर्शनाने जसा मोराचा पिसारा फुलला
बघून तुला जीव तसाच तृप्त जाला,
बघून तुला गरजले मेघ, विजाही कडाडल्या
आसमंतात देवातान्नी रन्गछटा उधळल्या...

तुज्या येण्याने पारिजातक असा बहरला
की वातावरणात सुगंध दरवळून आला,
बघून तुला सान्जवेळी संधीप्रकाश पसरला
दूर कोणीतरी कुठेतरी मल्हार गाऊन गेला...

शांत पाण्यावर हलका तरंग उमटला
नंतर आरम्भले तांडव अणि समुद्रही खवळला,
उसळल्या लाटा आणि नभाला जाऊन भिडल्या
तुला भेटण्या जीव असाच आतूर जाला.......

No comments:

Post a Comment