Friday, October 9, 2009

स्वप्न....

स्वप्न म्हणजे नेमकं असतं काय? फक्त ज़ोपेत बघतो ते का उघड्या डोळ्यांनी जागेपणी बघतो ते ?? स्वप्न का सत्याकडे जायचा मार्ग?? याचा विचार केल्यावर...

जेव्हा आपण आपल्या स्वप्नान्मागे धावतो
ती पूर्ण होण्यासाठी भान हरवून प्रयत्न करतोरात्रीचा दिवस करतो...
तेव्हा खरतर स्वप्न बघयालाही वेळ नसतो...
काय होतं? जेव्हा स्वप्न खरं होतं??
आनंद? समाधान? माज? की आणखीन काय??

तेव्हा खरतरं त्याच काहीच वाटेनसं होतं
कारण आता ते स्वप्न रहातं नाही
त्याच सत्य तयार होतं अणि ...
आता दुसऱ्याच विचारच स्वप्न होतं॥
अणि मग आपण विचार करू लागतो
अरे बापरे!! आता याच काय????

No comments:

Post a Comment