Friday, October 9, 2009

कधीतरी...

रोज कितीही cheerful रहात असेल माणूस ... तरी कधीतरी अशी वेळ येते प्रत्येकाच्याच life मधे येते की त्या दिवशी काही कारण नसताना अचानक उदास वगैरे वाटायला लागते अणि काढू तो मार्ग फसतो ... ती वेळ साधारण अशी असते....

कधीतरी

कधीतरी एकट बसल्यावर खूप रडावसं वाटतं
खूप विचार करूनही कळत नाही नक्की काय बिनसलेलं असतं !!

दिवस सगळा मजेत गेलेला असतो,
मित्रांबरोबर खूप दंगा केलेला असतो,
एखाद्या त्याला एखाद्या तिच्या वरुन खूप चिडवलेलं असतं,
hotel च्या बिलासाठी एखाद्याला बकरा बनवलेलं असतं,
एवढ होवुनही कळत नाही,
नक्की काय बिनसलेलं असतं,
पण एकटं बसल्यावर कधीतरी खूप रडावसं वाटतं!!

अशावेळी लावू ते फ़ोन ही busy लागतात,
लागलाच ph तर ती माणसं busy असतात,
अशावेळेस ना काही वाचता येत ना TV बघता येतो,
अशावेळेस light पण गेलेले असतात,
radio वरही एखादा sad song लागलेलं असतं,
guitar काढली वाजवायला तर तिचही tuning गेलेल असतं,
अशावेळेस कधीतरी खूप रडावसं वाटत,
खूप विचार करूनही कळत नाही नक्की काय बिनसलेलं असतं !!

हातात पेन घेवून काहीतरी लिहावसं वाटतं,
पण नुसतीच मनात विचारांची गर्दी होते,
हातात पेन डोक्यात विचार अणि गालावर काजल उतरलेल...
अणि कागद कोराच राहतो!!

तेव्हड्यात एखाद्या ख़ास मैत्रिणीचा ph येतो,
ख़ास असा बोलून होईपर्यंत दारावरची बेल पण वाजते,
आता डोळ्यातील पाणी हटलेले असते ,
चेहरयावर तेच हसू कायम असते,
खूप विचार करूनही समजत नाही,
मगाशी नेमका काय बिनसलं होतं,
अणि अत्ता तरी काय गवसलं?
का कदाचित एकटचं असताना... कारण नसताना
कधीतरी रडून घेतलं की सगळ्यान्समोर हसणं शक्य होतं???

No comments:

Post a Comment