Friday, October 9, 2009

गंध प्रहराचे ४ - आडरानातील कातर वेळ (उदास पाऊल थरकले…)

गंध प्रहराचे ४ - आडरानातील कातर वेळ (उदास पाऊल थरकले…) 

आड रानातील देऊळ.. एक पवित्र जागा.. कातरवेळ.. तिथे काही विपरीत घडले..बलात्कार, दरोडा काहीतरी.. पण सकाळी सगळे इतके निर्विकार पणे सुरळीत चालू होते की जसे काही झालेच नव्हते काल.. नेमके काय खरे? 


उदास पाऊल थरकले…

निरभ्र आकाशात अचानक, काळे मेघ गरजले 
कातरवेळी आडरानात उदास पाऊल थरकले!!
देव कुठला, धर्म कुठला, नशीबच रूसलेले, 
सावलीनेच घात केला, उदास पाऊल थरकले!!!

शांत होते वारे, अचानक वाहू लागले,
निःशब्दच होते सारे, उदास पाऊल थरकले!!
मंद होते सूर, एकदम तार सप्तकात वाजू लागले 
कातरवेळी तांडव माजला, उदास पाऊल थरकले !!

*********

शांत झोपले देव, पहाटे भजनाने जागे झाले, 
जसे काही झालेच नव्हते काल, फक्त स्वप्न पडलेले !!
काळे पडलेले गाभाऱ्यातील त्रिशूळ, परत उन्हात चमकले,
परत त्याच गाभाऱ्यात भजनाचे सूर उमटले!!!

-- अवनी गोखले टेकाळे 

No comments:

Post a Comment