Friday, October 9, 2009

अवनी... तुला असा कसं सुचतं याचं उत्तर...

बरेच असे हुशार भेटले अत्ता पर्यंत॥ अरे यार तू कविता करते॥ कसं सुचतं ग तुला असं काहीतरी?? dedicated to these comments and these ppl........


Pls, कविता कोणावर केली आहे विचारू नको
कदाचित ती जवळपासच कोणावरतरी असेल,
कदाचित ती तुज्यामुळेही सुचली असेल॥
एकदा कडेला नजर फिरवून तर बघ,
एकदा वळुन आरशात स्वतःचा चेहरा तर बघ॥
कळलं तुला तर चांगलच आहे
पण नाहीच कळलं काही तर
तर वाच अणि सोडून दे॥ पण ...
कोणावर लिहिली आहे विचारू नको ॥

Pls, तू असा कसा विचार करू शकते विचारू नको
कदाचित जे घडतं रोज तेच लिहिलं असेल,
कदाचित तुज्याही आयुष्यात तेच घडत असेल॥
एकदा लोकांची दुक्ख ऐकून तर बघ,
एकदा स्वतःच्याच आयुष्यात त्रयस्थपणे डोकावून तर बघ॥
कळलं तुला तर चांगलच आहे
पण नाहीच कळलं काही तर
तर वाच अणि सोडून दे॥ पण ...
कोणावर लिहिली आहे विचारू नको ॥

Pls, तू नुसतीच स्वप्नात जगतेस का विचारू नको
कदाचित भविष्याची हीच सुरवात असेल ,
त्याच स्वप्नांना पूर्ण करणारा उद्याचा दिवस असेल॥
एकदा तुही स्वप्नात जगुन तर बघ,
एकदा त्यांना खर करण्याचा प्रयत्न तर करून बघ
कळलं तुला तर चांगलच आहे ....


Pls, तुला असं कसा सुचतं विचारू नको
कदाचित तेव्हा फुलांचा गंध दरवळत असेल,
कदाचित तेव्हा कोणी रागदारी गात असेल,
कदाचित तेव्हा कोणाचीतरी आठवण येत असेल॥
एकदा समुद्र किनारी जाऊन तर बघ,
एकदा चंद्र उगवताना रंगलेले आभाळ तर बघ,
अणि कोणालातरी त्यावेळी मनापासून 'miss' तर करून बघ॥
एखादा श्वास फक्त त्या 'miss' साठी घेउन तर बघ
एकदा तेव्हा तूही काहीतरी लिहून तर बघ॥

No comments:

Post a Comment