Monday, February 14, 2011

पहिला अनुभव...

पहिला अनुभव म्हणालं कि सगळे कसे हातातलं काम टाकून वाचायला लागतात.. काहीतरी exiting असेल.. पहिलं प्रेम, पहिला पाउस, पहिल्यांदा propose, पहिल्यांदा जेव्हा... जाऊ दे..(काही वेळा अर्धवट बोललेली वाक्य जास्त परिणाम साधून जातात बहुतेक.. :P ) तर सांगण्याचा मुद्दा हा कि पहिला अनुभव म्हणाल्यावर हे जे काही विचार येत आहेत मनात तसा काही gr8 चविनी वाचण्यासारखा exiting वगैरे नाहीये.. पण तरीही वाचावा अश्या अपेक्षेने हे title ..
मग तरीही कसला आहे हा "अनुभव" ज्याच्या विषयी इतका आवर्जून लिहावासा वगैरे वाटत आहे?? तो आहे ""स्मशान आतून पाहण्याचा"".. आज पर्यंत चालत आलेल्या चाली रिती म्हणजे.. बायकांनी स्मशानात नाही जायचं.. आता हे योग्य आहे का अयोग्य हा वाद नाहीये .. आणि त्यात काही फार great कुतूहल वाटण्यासारखं नाही आहे.. कि का म्हणून नाही.. चला पाहू तरी एकदा कसा असतं ते.. त्यामुळे आत्ता पर्यंत कधी असं स्मशानात वगैरे जायची वेळ आली नव्हती.. (exept जामनगर चा स्मशान.. ते एक प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ म्हणून पाहिला आहे.. कधी वेळ आली तर जरूर पहा.. अप्रतिम!!! )
काळ दिवस वगैरे असे काही शब्द वापरायचे नाहीयेत मला.. पण खर तर तसाच काहीसा दिवस.. प्रसन्न सुरु झालेली सकाळ आणि सकाळचा सूर्योदय पाहिल्यावर कळला पण नव्हता आजचा दिवस काय घेऊन आला असेल.. चर्चा, मधेच डोळ्यात पाणी, मग स्वताला सावरणं.. या सगळ्यामध्ये लक्षात आला कि आत्ता सगळ्यांबरोबर वैकुंठात जायची गरज आहे!!
काहिसं अपरिचित वातावरण.. स्मशान शांतता म्हणजे काय ते तेव्हा कळलं.. ना डोळ्यातून पाणी ना काही बोलायची मनस्थिती.. पण मनात मात्र प्रत्येकाच्या असंख्य विचार.. डोकं फोडून बाहेर येतील एवढे डोक्यात मावेनासे झालेले.. वातावरणात भरून राहिलेले.. सगळे नुसते बघत होते एकमेकांकडे, ओळख आहे का नाही या मधले तरंगणारे भाव, निरर्थक, निर्विकार.. रडायचे त्राण नाहीत का हसायची इच्छा नाही.. डोकं काहिसं बधीर पण तरीही व्यवस्थित भान होता.. सुसंबद्ध विचार करण्याएवढा..
सभोवतीची झाडी.. किर्र शांतता असं वर्णन करावं अशी, शंकराचा तो रुद्रवातारातला फोटो.. देवता असून भीती वाटावी असा.. त्या फोटो च्या शेजारी एक पाटी.. मृत व्यक्तीचे विनामूल्य फोटो २४ तासात उपलब्ध.. अरे काय हे.. पण गरज लागते म्हणे त्याची कधी कधी.. यम देवाची केलेली प्रार्थना.. त्या प्रार्थने मधले शब्द तर खूप जास्त डोकं सुन्न करणारे होते.. किती विचित्र होता हे सगळं.. कळण्याच्या पलीकडचा.. अव्यक्त.. शब्दातीत.. आणि नंतर.. त्या दिवसानंतर मी जितक्या वेळा केशरी रंग बघते तेव्हा तोच दिवस जसाच्या तसा डोळ्यासमोर परत घडून जातो.. व्यक्तीचे शेवटचे दर्शन, अगदी अंतिम क्षण आणि त्यात क्षणार्धात मिसळलेला केशरी रंग..
येणारा प्रत्येक जण कधी ना कधी जाणार.. आपण त्याला हसत मुखाने सामोरे गेले पाहिजे वगैरे सगळी खरी असली तरी तेव्हा कोरडी वाटणारी वाक्य.. कोणाची पोकळ सांत्वने, तर कोणाच्या भावना अगदी खर्या.. लोकांचे असंख्य प्रश्न.. लोकांची भाष्य.. हा तर स्वतंत्र लेखनाचा विषय आहे कि आशा वेळी लोक काय बोलू शकतात,.. तर असो.. जन्म मृत्यू वर भाष्य करण्या एवढी अक्कल आलेलीच नाही आपल्याला.. पण तरी.. तो प्रसंग खूप काही सांगून गेला.. आणि अजून पण सांगत राहतो..
फार तत्वज्ञान नाही कळत.. पण एवढा नक्की सांगितला त्या दिवसांनी कि आपल्याला खूप कमी वेळ मिळाला आहे तो वेळ maximum utilize केला पाहिजे.. family , friends , career , याच बरोबर छंद.. छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंद आहे.. घरातले नातेवाईक.. जे मित्रांसारखे आहेत सगळं मनातलं सांगता येईल असे.. खूप सारे मित्र जे नात्याचे असल्या सारखे जीव लावणारे आहेत, एखादा तो/ती जीव कुर्बान करावा असा.. एखादे मस्त पुस्तक, एखादी छानशी कविता, guitar च्या झंकारलेल्या तारा , bike ची १२०+ स्पीड ची भन्नाट ride, bike वरून लेह-लद्धाख!! .. एखादा ट्रेक खडतर वाट दाखवणारा, चाहुबाजूचा निसर्ग, सूर्योदय, सूर्यास्त, एखादी ट्रीप निवांत relax करता येईल अशी, एखादी जमून गेलेली छानशी रेसिपी लज्जत वाढवेल अशी, एखादे चित्र, एखादे गाणे, संगीत,नृत्य, एखादे भांडण मैत्री वाढवणारे, सुंदर photography , appriciate करावी अशी movie , ओरिगामी, wood karving , वेगवेगळी mathamatical puzzles , आणि अजून अशा किती तरी गोष्टी आहेत.. आयुष्याच्या शेवटी अशी हुरहूर नको लागायला अरे हे मला करायचं होता पण राहूनच गेला.."शेवटचा अनुभव" घेताना असं वाटायला नको कुठला अनुभव घ्यायचा राहूनच गेला.. वेळच नाही झाला..
आत्ता वेळ आहे.. आज!!! आणि हो येणारा प्रत्येक अनुभव समर्थ पणे पेलायचा आहे.. त्याला आपला म्हणून accept करायचं आहे!!!!

1 comment:

  1. atishay sundar ahe.. kharch jivanat khup sarya chotya chotya goshti ahet ki tyamdhe khup sara aanand asto.. mothya gosthi,aim sadhya kart astana lahan-sahan ghatinankade durlakshit nahi zal pahije.. enjy d every moment of life..kahi vichar karun kahi vichar n karta..sukh-dukhache kshan dekhil vyavsthit hatalata ale pahije.. nd mahtvache vel kami asto pn vel geleli naste.. kshanana aathvanit rupantr kart anubhav ghet rahu..

    ReplyDelete