Friday, October 9, 2009

सायंकाळ....

अशी एक सायंकाळ असावी
शुष्क नळीची वेळू व्हावी॥
सूर तालात लय मिसळावी
त्यात सगळी रागदारी उतरावी॥
नकोत बंधने वेळाची
सयांकाळी भैरवी गाता यावी॥
गाता यावा मल्हार आभाळात ढग नसताना,
अणि तरीही बरसाव्यात जलधारा
आपण मल्हार गाताना॥
अशी एक सायंकाळ असावी
सूर तेच पण नव्याने कळावे
साध्या शब्दांचेही गाणें व्हावे॥
मंथन करता गवसावे सारे
जे हरवले ते मिळावे सारे ॥

1 comment:

  1. क्या बात है! अवनी, खूप छान.

    ReplyDelete