Friday, October 9, 2009

आनंद...

आनंद तर नेहमीच होतो प्रत्येकाला॥ त्यात काही नवीन सांगण्या अणि लिहिण्या सारखा काही नाही खरं तर॥ ती अनुभूति अगदी लहान असल्यापासून प्रत्येकानी घेतलेलीच असते॥ पण तरी काही वेळा अशा येतात की आनंद म्हणजे काय ते नव्याने समजतं .. आनंद पण पेलला जात नाही तेव्हा नक्की काय होता याचा आलेला एक अनुभव..
अशीच एक संध्याकाळ ॥ साधारण दोन-तीन वर्षांपूर्वीची ॥ वळवाचा पाउस ॥ में महिन्याचे दिवस आणि .............


खूप आनंद जाल्यावर काय होतं?
नाचावसं वाटतं? गावासं वाटतं?
का जोरजोरात ओरडावसं वाटता?
खूप आनंद जाल्यावर नक्की काय होतं??

खरं तर खूप आनंद पण कधी सहन होत नाही
डोकं बधिर होतं अणि काहीच सुधरत नाही॥
मानत एक प्रकारची पोकळी निर्माण होते
त्या क्षणी मनात काहीच विचार येत नाही॥

खूप भारी वाटत असतं जे व्यक्त करता येत नाही
जसे या क्षणासाठी कोणाकडे शब्दच नाहीत॥
बोलायलाही सुचत नाही॥ हसायलाही येत नाही॥
डोळे भरून वहायला लागतात पण त्याचा रडणं हा अर्थ होत नाही॥

तेव्हा डोळ्यासमोर जे दिसतं... कधी स्वप्नात दिसलं नव्हतं
कधी सत्यातही दिसणार नाही ॥
असे काहीतरी ज्याला रंग नाही रूप नाही
फक्त एक अस्तित्व जाणवत आहे ज्याला आकार नाही॥

वाटतं तेव्हा हा भार पेलण्याची खरं तर आपली ताकद नाही
खरचं अति आनंद पण कधी सहन होत नाही॥

No comments:

Post a Comment